आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरीप पिकांची वाढ खुंटली, 3 आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने पिके जळण्याच्या मार्गावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पावसाने ताण दिल्याने पिकांची वाढ खुंटली असून चारापिके जळून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यात लाख ५७ हजार ७७७ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या अाहेत. यंदा मूग उडिदाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बाजरीच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त पेरण्या झाल्या आहेत. मात्र, तीन आठवड्यांपासून पाऊस थांबल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला पुन्हा पावसाची प्रतीक्षा अाहे. पावसाअभावी पिकेही जळून जात असल्याने चाऱ्याचे भावही वाढले आहेत.
 
आतापर्यंत जिल्ह्यात ३७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. संगमनेर, पाथर्डी, शेवगाव, कोपरगाव हे तालुके वगळता उर्वरित सर्वच तालुक्यांत ३० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जून महिन्यात अकोले तालुक्यात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला होता. मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यात या तालुक्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे भंडारदरा धरणातील पाणीसाठ्यातही काहीअंशी वाढ झाली. मुळा निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने या दोन धरणांतील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली. अकोले तालुक्यात भाताची लागवड सुरू झाली आहे. भात लागवडीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे नाशिक, नगरहून मजूर तेथे जात आहेत.

जिल्ह्यात ऊस वगळता लाख ७८ हजार ६३८ हेक्टर क्षेत्र खरिपाचे आहे. उसासह लाख ९९ हजार ८१३ हेक्टर क्षेत्र खरिपाचे आहे. २८ जूनपर्यंत जिल्ह्यात लाख ६० हजार ८१५ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या. त्यात २९ हजार ७०१ हेक्टरवर बाजरी, १० हजार ७२९ क्षेत्रावर मका, ४० हजार ४५३ हेक्टरवर तृणधान्याच्या पेरण्या झाल्या होत्या. २८ जूननंतर खरिपाच्या पेरण्यांत आणखी वाढ झाली. ११ जुलैपर्यंत लाख ५७ हजार ७७७ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत.
 
जिल्ह्यात बाजरीचे लाख ८२ हजार ६३१ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ६१ हजार ४४४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सोयाबीनच्या ५८ हजार २८२ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मक्याचे क्षेत्र ५३ हजार आहे. त्यापैकी ४३ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. मूग उडिदाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मुगाचे अवघे १२०० हेक्टर क्षेत्र आहे. मात्र, पेरण्या २५ हजार ६३४ हेक्टरवर झाल्या आहेत. उडिदाचे केवळ हजार २२० हेक्टर क्षेत्र असताना पेरण्या ३४ हजार हेक्टरवर झाल्या आहेत. गेल्या वर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले होते. यंदा तुरीचे क्षेत्र काही प्रमाणात कमी झाले आहे. तुरीचे १२ हजार हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत १० हजार हेक्टरवर पेरा झाला आहे.
पावसाने दडी मारल्याने त्याचा परिणाम मका, घास या पिकांवरही होत असून, या चारापिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे बाजारात चाऱ्याची टंचाई निर्माण झाली असून, मका, घास याबरोबर उसाच्या वाढ्याचे दर वाढू लागले आहेत.
 
पाच तालुक्यांत ३० टक्केही पाऊस नाही
जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, शेवगाव, पाथर्डी जामखेड तालुक्यात ३० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यात खरिपाच्या पेरण्या अत्यंत कमी प्रमाणात झाल्या आहेत. आतापर्यंत राहाता तालुक्यात सर्वाधिक ७५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. श्रीरामपूर ३४ टक्के, राहुरी ३३ टक्के, नेवासे ४५ टक्के, नगर ४१ टक्के, पारनेर ४१ टक्के, कर्जत ५२ टक्के, तर श्रीगोंदे तालुक्यात ३२ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
 
२० टक्के क्षेत्र बाधित होण्याची शक्यता
पाऊस थांबल्याने मग, उडीद हे पीक माना टाकू लागले आहे. आणखी चार दिवस ही पिके चांगली राहू शकतात. त्यानंतर मात्र पाऊस झाल्यास २० टक्के पेरण्या वाया जाण्याची शक्यता आहे.
- पंडित लोणारी, अधीक्षक कृषी अधिकारी.
 
बातम्या आणखी आहेत...