आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किडनी प्रत्यारोपणासाठी मदत करण्याचे आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रोफाईल फोटो - Divya Marathi
प्रोफाईल फोटो
नगर- शहरातील निर्मलनगर येथील छाया नंदू तवले यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. त्यांच्यावर पुणे येथील जहांगीर रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया १९ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी लाख ९० हजार रुपयांचा खर्च येणार आहे. तवले यांची आर्थिक परिस्थिती इतका मोठा खर्च पेलण्याची नसल्याने या शस्त्रक्रियेसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी त्यांना मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आले आहे. 
छाया तवले यांच्या जहांगीर रुग्णालयात गेल्या दीड महिन्यापासून डायलिसिस सुरू आहे. या उपचारासाठी अाठवड्याला १५ ते १७ हजार रुपये खर्च येत आहे. तवले यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया १९ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी लाख ९० हजार रुपयांचा खर्च येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तवले यांना मदत करू इच्छिणाऱ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (छाया नंदू तवले एसबीआय-आयएफसी कोड - ०१२३०६) या खात्यावर पैसे वर्ग करावे मदतीबाबत ९८२२४३०७४९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...