आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपर्डी खटला : उज्ज्वल निकम यांची साक्ष घेण्याची मागणी फेटाळली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर  - कोपर्डी (ता. कर्जत) खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यासह सहा जणांना बचाव पक्षाचे साक्षीदार म्हणून तपासण्याची परवानगी मिळावी, यासाठी आरोपी संतोष भवाळच्या वतीने केलेला अर्ज न्यायालयाने साेमवारी फेटाळला.  
 
कोपर्डी खटल्यात  आरोपी भवाळ याच्या वतीने बचाव पक्षाला सहा साक्षीदार तपासायचे होते. त्यांच्या नावांची यादी असलेला अर्ज अॅड. खोपडे यांनी न्यायालयात दिला होता. त्यात रवींद्र चव्हाण, अॅड. उज्ज्वल निकम, डॉ. राजेंद्र थोरात (स्टेट ब्युरो ऑफ हेल्थ इंटेलिजन्स), डॉ. उदय निरगुडकर (संपादक), नाशिकच्या न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे संचालक व जिल्हाधिकारी अभय महाजन यांचा समावेश होता.  दोन्ही बाजूंच्या वतीने ७ जुलैला या अर्जावर युक्तिवाद करण्यात आला. विशेष सरकारी वकील निकम यांनी विरोध करत हा अर्ज फेटाळण्याची विनंती न्यायालयाला केली होती. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोमवारी न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. दरम्यान, या निर्णयाविरुद्ध अाैरंगाबाद खंडपीठात अपील करणार असल्याचे अारेापीचे वकील अॅड. खोपडे यांनी सांगितले. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांच्या नकलाही त्यांनी काढून घेतल्या आहेत. अपिलाविषयीची माहिती त्यांना २४ जुलैला होणाऱ्या सुनावणीच्या वेळी जिल्हा सत्र न्यायालयाला द्यावी लागणार आहे.  
बातम्या आणखी आहेत...