आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपर्डी: आरोपीच्या भावानेच मागितली रवींद्र चव्हाणांकडे मदत; बचाव पक्षाच्या साक्षीदाराची कबुली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- कोपर्डी खटल्यातील आरोपी संतोष भवाळचा भाऊ बाळू याने आपल्याकडे आर्थिक व कायदेशीर मदत मागितली होती.  त्यामुळे अनेकांशी चर्चा करून आपण यूट्यूबवरून तीन व्हिडिओ डाऊनलोड केले. त्यांच्या सीडी तयार करून दिल्या, अशी कबुली बचाव पक्षाचे साक्षीदार तथा यशदाचे माजी अधिकारी रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी न्यायालयात दिली. 
   
अॅड. बाळासाहेब खोपडे यांनी बचाव पक्षातर्फे रवींद्र चव्हाण यांची सरतपासणी घेतली. कोपर्डीसंदर्भात आपण यूट्यूबवर काही वृत्तवाहिन्यांच्या बातम्या पाहिल्या. त्यात मुख्यमंत्र्यांचे भाषण, उज्ज्वल निकम व भय्यू महाराज यांच्या भेटीबद्दलची बातमी व मंत्री विनोद तावडे यांनी दिलेल्या मुलाखतीचे व्हिडिओ होते. ते  डाऊनलोड करून आपण त्याच्या सीडी बनवून भवाळच्या भावाला दिल्या. या व्हिडिओमध्ये अॅड. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचे दोषारोपपत्र तयार केल्याचे नमूद असल्याचे ते म्हणाले.  विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पावणेदोन तास चव्हाण यांची उलटतपासणी घेतली. यात चव्हाण यांनी संगणकशास्त्राची पदवी घेतली नाही, संगणकाचे जुजबी ज्ञान असल्याचे सांगितले. यूट्यूबवर व्हिडिओ कसे अपलोड करायचे, ते कोण करते याबद्दल निकम यांनी प्रश्न विचारले. व्हिडिओचे सत्यता प्रमाणपत्र यूट्यूब देत नसल्याचे त्यांनी मान्य केले. आपणही तसे प्रमाणपत्र घेतले नसल्याचे चव्हाण म्हणाले. त्यामुळे कोर्टात दिलेले व्हिडिओ खरे किंवा कसे, याचा कोणताही पुरावा आपल्याकडे नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले.  

व्हिडिओवर प्रश्नचिन्ह  
अॅड. निकम मोर्चाबद्दल बोलताना ५६ सेकंदांचा एक व्हिडिओ कोर्टात प्रोजेक्टरवर दाखवण्यात आला. त्यात निकम यांच्या तोंडी कोठेही “मराठा’ हा शब्द नाही. व्हिडिओत त्यांना प्रश्न विचारणारा निवेदक किंवा तसा प्रश्नही दाखवलेला नाही. “मराठा समाजाचे मोर्चे देशाला मार्गदर्शक’ हे वाक्य निकम यांच्या तोंडी नाही. केवळ तशी अक्षरे असलेली पट्टी स्क्रीनवर दिसते. निकम यांनी कोपर्डी घटनेबद्दल काहीही वक्तव्य केलेले नाही. संबंधित वाहिनीकडून मूळ व्हिडिओही चव्हाण यांना मिळवला नाही. त्यामुळे हा व्हिडिओ संपादित केलेला असल्याचे अॅड. निकम उलटतपासणी घेताना म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...