आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेपर्डीत अाज निर्भयाला वाहणार श्रद्धांजली; मराठा संघटनांची बैठक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
मिरजगाव- नगर जिल्ह्यातील  कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण हत्येच्या घटनेस गुरुवारी (१३ जुलै) एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने निर्भयाला श्रद्धांजली वाहण्यासाठी पालकमंत्री राम शिंदे, विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक मान्यवर कोपर्डीत येत आहेत. कीर्तन, प्रवचन व मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत निघणाऱ्या मराठा क्रांती मूकमोर्चाच्या नियोजनाबाबत, तसेच मराठा समाजातील विविध प्रश्न व भविष्यातील वाटचालीबाबत या वेळी आढावा घेण्यात येईल. 
 
कोपर्डी येथे पीडित मुलीचा अंत्यविधी ज्या ठिकाणी झाला, तेथे तिचे स्मारक बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. 
 
गुरुवारी सकाळी नऊ वाजता वासुदेव आर्वीकर महाराजांचे (धुळे) कीर्तन होईल. त्यानंतर भय्यू महाराजांचे प्रबोधनपर प्रवचन होईल. दुपारी १ वाजता मराठा क्रांती आढावा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ९ ऑगस्टला मुंबईत निघणाऱ्या राज्यस्तरीय मराठा क्रांती महामूकमोर्चाची तयारी व पुढील दिशा याबाबत विचारविनियम करून महत्त्वपूर्ण निर्णय या वेळी घेतले जाणार असल्याची माहिती संयोजक लालासाहेब सुद्रिक यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...