आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीडशे वर्षांच्या इतिहासात वकील संघटनेत प्रथमच फूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नगर - दीडशे वर्षांच्या इतिहासात नगर शहर वकील संघटनेत आपापसांतील वाद चांगलेच उफाळून आले आहेत. गुरुवारी सुमारे सव्वाशे वकिलांच्या बैठकीत सध्याची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा ठराव मांडण्यात आला. पुढील कार्यकारिणी निवडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारीही नियुक्त करण्यात आले. दरम्यान, वकील संघाच्या अध्यक्षांनी मात्र ही बैठकच बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले. 
 
वकील संघाचे अध्यक्ष लक्ष्मण कचरे कार्यकारिणीवर बहुतांश सभासदांचा रोष आहे. त्यामुळे कार्यकारिणी बरखास्त करण्यासाठी अॅड. तुळशीराम बाबर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. अॅड. कारभारी गवळी, अॅड. सुरेश लगड यांनी अॅड. बाबर यांना बैठकीचे अध्यक्ष म्हणून घोषित केले. बाबर यांनी सर्वानुमते सध्याचे अध्यक्ष कचरे यांची कार्यकारिणी बरखास्त केल्याचे जाहीर केले. 
 
अध्यक्षांनी नगरच्या बारमध्ये दोन गट निर्माण केले. २६ जानेवारीलाच कार्यकारिणीची मुदत संपली, तरीही अध्यक्षपद सोडत नाहीत. बारला कधीही विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे त्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे आरोप यावेळी कचरे यांच्यावर ठेवण्यात आले. 
 
ही बैठकच बेकायदेशीर 
- आमच्या कार्यकारिणीची मुदत २२ जानेवारी २०१८ ला संपत आहे. त्यामुळे कार्यकारिणी बरखास्त होण्याचा प्रश्नच नाही. गुरूवारी झालेल्या वकिलांच्या बैठकीबाबत कोणीही काही कळवलेले नव्हते. आरोप करणाऱ्यांमुळेच वकील संघटनेत फूट पडली आहे. ही बैठकच बेकायदेशीर आहे.
'' अॅड.लक्ष्मण कचरे, अध्यक्ष, शहर वकील संघ, अहमदनगर. 
बातम्या आणखी आहेत...