आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकात्मिक जल विकास आराखडा राज्य सरकारने तातडीने फेटाळावा, राधाकृष्ण विखे यांची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - तुटीचेखोरे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी खोऱ्यातील पाणीप्रश्नाचा प्राधान्यक्रम आणि ठोस उपाय सूचवता एकांगी विचाराने सादर करण्यात आलेला एकात्मिक जल विकास आराखडा सरकारने तातडीने फेटाळावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली. गोदावरी खोऱ्यातील लोकप्रतिनिधी, शेतकरी, जनता यांना विचारात आणि विश्वासात घेताच तयार करण्यात आलेला हा आराखडा म्हणजे सरकारची दिशाभूल आणि पुन्हा प्रादेशिक वादाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 
 
गोदावरी खोऱ्याचा एकात्मिक जल विकास आराखडा मुख्यमंत्र्यांना नुकताच सादर करण्यात आला. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे म्हणाले, केवळ निवृत्त आधिकाऱ्यांनी गोदावरी खोऱ्यातील पाणीप्रश्नावर काढलेले निष्कर्ष सरकार स्वीकारणार असेल, तर तो लाभक्षेत्रावर मोठा अन्याय ठरेल. मागील अनुभव लक्षात घेता गोदावरीचे लाभक्षेत्र उद््ध्वस्त करण्याचा हा पुन्हा प्रयत्न आहे का, असा सवालही त्यांनी केला. 
 
यापूर्वी असंख्य लोकांनी अभ्यासपूर्ण सूचना केल्या आहेत. या खोऱ्यातील पाणी नव्याने वाढले पाहिजे, असे प्रयत्न यापूर्वीच व्हायला पाहिजे होते, असे सांगून विखे म्हणाले, बाळासाहेब विखे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पाणी परिषदेने पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवण्याबाबत सरकारला प्रस्ताव सादर केले आहेत. मुख्यमंत्र्यांनीही या प्रस्तावावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. यावर ठोस निर्णय अपेक्षित आहेत. जल विकास आराखड्यात यापेक्षा काय वेगळे आहे? गोदावरी खोऱ्यात नवीन पाणी निर्माण करण्याशिवाय पर्याय नाही ही वस्तुस्थिती असताना या आराखड्याच्या माध्यमातून नवीन निष्कर्ष काढून पुन्हा नव्याने प्रादेशिक वाद निर्माण करण्याचा हेतू आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 
बातम्या आणखी आहेत...