आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी-शिवसेनेत लढत, अर्ज दाखल होताच प्रचाराची रणधुमाळी सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विधान परिषदेसाठी मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विद्यमान अरुण जगताप शिवसेनेचे शशिकांत गाडे यांच्यात होणार असली, तरी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने संभ्रम वाढला आहे. ससाणे यांनी अर्ज मागे घेतल्यास या दोन्ही उमेदवारांपुढे ससाणे यांचे आव्हान असणार आहे. या निवडणुकीसाठी जणांनी एकूण १४ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य जागेसाठी २७ डिसेंबरला मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी नगरच्या जागेवर प्रारंभी सर्वच पक्षांनी दावा केला होता. दोन महिन्यांपूर्वी पालकमंत्री राम शिंदे यांनी ही जागा भाजपच लढवणार असल्याचा दावा केला होता. नंतर मात्र सर्वच पक्षांची गणिते बदलली. प्रारंभी युती-अाघाडी जागावाटपाच्या मुद्यावरुन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना-भाजपमध्ये मतभेद निर्माण झाले होते. नगरची जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला, तर भाजपने शिवसेनेला सोडण्याचे जाहीर केले होते. जागावाटपाचा तिढा संपला असल्याचे या चारही पक्षांकडून सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे माजी आमदार जयंत ससाणे यांनी काँग्रेस अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने संभ्रमात आणखी वाढ झाली आहे.

राष्ट्रवादीच्या वतीने विद्यमान आमदार अरुण जगताप यांनी, तर शिवसेनेकडून दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमनाथ तनपुरे, हेमंत ढगे, भरत नाहटा, मच्छिंद्र सुपेकर, दत्तात्रेय पानसरे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ससाणे यांनी पक्षाचा एबी फॉर्म सादर केलेला नाही. निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांपैकी पाच उमेदवार श्रीगोंदे तालुक्यातील अाहेत.

शनिवार (१२ डिसेंबर) हा उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस असून, या दिवशी या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. उमेदवारी अर्ज दाखल होताच उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली. प्रत्यक्ष भेटीगाठींवर उमेदवारांचा जोर आहे. या निवडणुकीत सर्वाधिक मतदार हे जिल्हा परिषद सदस्य नगर महापालिकेचे आहेत. जिल्हा परिषदचे स्वीकृत वगळता ७५ सदस्य आहेत, तर नगर महापालिकेचे स्वीकृत वगळता ६६ सदस्य आहेत. या दोन स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांची या निवडणुकीत निर्णायक भूमिका असेल. स्वीकृत सदस्यांच्या मतदानाबाबत बुधवारी निर्णय होणार होता, मात्र अद्यापि झालेला नाही. एकूण ३८ स्वीकृत सदस्य आहेत.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सेनेचे शशिकांत गाडे अनिल राठोड यांनी शक्तिप्रदर्शन केले.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे भरत नाहाटा.

उमेदवारी अर्जाची सूचना काँग्रेसची
^काँग्रेसच्यासूचनेनुसारचपक्षाचा अधिकृत एक अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. येत्या दोन दिवसांत पक्षाच्या आदेशानुसार आपली भूमिका ठरवली जाईल.'' जयंत ससाणे, जिल्हाध्यक्ष,काँग्रेस.

कडक पोलिस बंदोबस्तात आज होणार अर्जांची छाननी
राष्ट्रवादीकाँग्रेसचेउमेदवार अरुण जगताप शिवसेनेचे शशिकांत गाडे यांनी एबी फॉर्म सादर केले आहेत. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जयंत ससाणे, सोमनाथ तनपुरे, भरत नाहटा दत्तात्रेय पानसरे यांनी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्जांची गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल कवडे हे छाननी करतील. छाननीसाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला आहे.'' अरुण आनंदकर, उपजिल्हानिवडणूक अधिकारी.
बातम्या आणखी आहेत...