आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यकृताच्या प्रवासासाठी थांबले नगर पुणे, '१०८' ने नेले पुण्याला यकृत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- गरजू रुग्णापर्यंत यकृत पोहोचवण्यासाठी पोलिसांनी नगर पुण्याची वाहतूक थांबवली आणि औरंगाबादहून यकृत प्रत्यारोपणासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील गरजू रुग्णापर्यंत पोहोचवले. मात्र, हे यकृत वेळेत पोहचण्यासाठी अहमदनगर आिण पुणे या दोन शहरांमधील वाहतूक थांबवण्यात आली होती.

डॉक्टर, वाहतूक पोलिस आणि १०८ रुग्णवािहकेचा पायलट अशोक कराळे यांच्या प्रयत्नांनी नगरवरून दुपारी वाजून २२ निघालेले जिवंत यकृत १२० किलोमीटर अंतर कापून पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पोहोचले. औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयातून मंगेशकर हॉस्पिटलचे डॉ. देशमुख यांचे पथक यकृत प्रत्यारोपणासाठी पुण्यात घेऊन जात होते. यकृत घेऊन येणारे वाहन नगरजवळील धनगरवाडी येथे पंक्चर झाले. तेथून नगरच्या पोलिसांनी त्यांच्या वाहनात हे यकृत डीएसपी चौकात अाणले. डीएसपी चौकातून १०८ रुग्णवािहकेत या यकृताचा दुपारी वाजून २२ मिनिटांनी पुण्यासाठी प्रवास सुरू झाला. १०८ रुग्णवािहकेत डॉ. देशमुख, डॉ. विद्या बारवकर पायलट कराळे हे होते. यकृत प्रत्यारोपणासाठी नेण्यात येत असल्याचा संदेश पोलिसांना दिला होता. त्यानुसार वाहतूक नियंत्रित करून १०८ रुग्णवािहकेला जाऊ देण्यात आले. एरव्ही नगरची वाहतूक बेशिस्त म्हणून ओळखली जाते. मात्र, शुक्रवारी नगरकरांनी पोलिसांच्या आवाहनाला दाद देत माणुसकीच्या भावनेतून काहीवेळ थांबले होते. पुढे वाघोलीपासून पुण्यात वाहतूक थांबण्यात आली. अशाप्रकारे हे यकृत सायंकाळी वाजून २० मिनिटांनी पुण्यात पोहोचले.

६ तासांत पोहचायचे होते
औरंगाबादयेथील रुग्णाचे हे यकृत प्रत्यारोपणासाठी पुण्यात सहा तासांत पोहचणे गरजेचे होते. मात्र, अडथळा येऊनही हे यकृत पाच तासांत पुण्यात पोहचले.

वाघोली ते मंगेशकर हॉस्पिटल अंतर कापले २० मिनिटांत
वाघोलीपासूनपुणे शहरात जाण्यासाठी मोठ्या वाहतूक कांेडीचा सामना करावा लागतो. मात्र, पुणे पोलिसांना दिलेल्या सूचनेनुसार पोिलसांनी अगोदरच वाहतूक थांबवली होती. वाघोली ते दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलपर्यंत हे अंतर अवघ्या २० मिनिटांत कापले, अशी माहिती १०८ रुग्णवाहिकेच्या डॉ. विद्या बारवकर जिल्हा समन्वयक डॉ. नरेंद्र मुळे यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना दिली.