आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अच्छे दिन: ... आणि भारनियमनाच्या डोकेदुखीतून यांची झाली सुटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंजर- बार्शिटाकळी तालुक्यातील पिंजर हे महत्त्वाचे गाव असून, आजूबाजूच्या ४० गावांचे हे केंद्रबिंदू आहे. मात्र येथील जनता भारनियमनामुळे त्रस्त झाली होती. सिंगल फेज योजना कार्यान्वित असल्यानंतरही येथे सहा ते आठ तास भारनियमन करण्यात येत होते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने पिंजरला अच्छे दिन आले असून, येथील नागरिकांची भारनियमनातून सुटका झाली आहे.

सप्टेंबर रोजी झालेल्या महाराजस्व अभियानांतर्गत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील आमदार हरीश पिंपळे यांनी पिंजरवासियांनी केलेल्या मागणीची दखल घेत पिंजरला भारनियमनमुक्त करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळे येथे रात्री अपरात्री होणारे भारनियमन टळले असून, नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शंभर टक्के वसुली होत असतानाही भारनियमन केले जात असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. महावितरणक तक्रारी केल्यानंतरही भारनियमन सुरूच हाेते. थ्री फेजचे भारनियमन सुरू असतानाही गावात प्रकाशाऐवजी अंधाराचेच साम्राज्य पसरत असे. त्यामुळे नागरिकांनी सप्टेंबरला महाराजस्व अभियानादरम्यान पालकमंत्री मूर्तिजापूरचे हरीश पिंपळे यांच्याकडे पिंजरला भारनियमनमुक्त करण्याची मागणी केली. त्यांनी गावाला भारनियमनमुक्त करण्यासाठी पाऊल उचलले. अखेर पिंजर भारनियमनमुक्त झाले आहे. या बदलामुळे पिंजर परिसरातील वडगाव, पार्डी, मोझर, सोनखास, पातूर इत्यादी गावांना लाभ होणार आहे. गावाला भारनियमनमुक्त करण्यासह पाणीप्रश्न, रस्ते, अतिक्रमण अन्य रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी सरपंच अंजली इंगळे, सगीरभाई, संतोषआप्पा विभुते, दीपक सदाफळे, विकास दांगट, रमेशआप्पा खोबरे, पांडुरंग ठक यांनी पाठपुरावा केला.

अखेर समस्या मिटली
भारनियमनामुळेपिंजरचे नागरिक वैतागले होते. त्याचा रोष नागरिकांकडून राजकारणी महाविरणच्या कर्मचाऱ्यांवर व्यक्त करण्यात येत होता. मात्र आताच्या या निर्णयामुळे नागरिकांची या समस्येतून सुटका झाली. ठामपणे निर्णय घेण्याचीच आवश्यकता आहे.'' मारोतीआप्पापेद्ये, ज्येष्ठ नागरिक, पिंजर

वरिष्ठांचे पत्र मिळाले
पिंजरलालोडशेडिंगमुक्त करण्यासंदर्भात वरिष्ठांचे पत्र मिळाले आहे. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून होणार आहे. लोडशेडिंग बंद झाल्याने नागरिकांचा महावितरणकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल एवढे मात्र निश्चित आहे. तसेच पिंजर फिडरची क्षमता वाढवण्याची गरज आहे.'' वैभवराऊत, कनिष्ठ अभियंता, पिंजर