आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोणी मावळा खटला: आरोपीने मारलेली­ फुशारकी मातीच्या नमुन्यांमुळेच दोषी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा पराक्रम दुकानदाराला फुशारकीने कथन करणे, पीडित मुलीच्या नाकातोंडात कोंबलेली माती, तिच्या दफ्तराला कपड्यांना लागलेली माती, तसेच आरोपींच्या कपड्यांवर आढळलेले मातीचे नमुने एकच असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे लोणी मावळा (ता. पारनेर) बलात्कार खून खटल्यात तीन नराधम क्रूर आरोपींना जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी दोषी ठरवले. खटल्यात सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले. तिन्ही आरोपींना मंगळवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. 
 
संतोष लोणकर, मंगेश लोणकर दत्तात्रय शिंदे अशी नराधम आरोपींची नावे आहेत. २२ ऑगस्ट २०१४ रोजी सायंकाळी पाऊस सुरू असल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या १६ वर्षीय मुलीवर त्यांनी क्रूरपणे आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. आरडाओरडा करू नये म्हणून तिच्या नाकातोंडात चिखल काेंबला. तसेच धारदार स्क्रू-ड्रायव्हर तिच्या कपाळावर, कानाजवळ, छातीवर खूपसून निर्घृणपणे तिचा खून केला. पारनेर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता. 
 
नगर ग्रामीणचे तत्कालीन (सध्या दिवंगत) पोलिस उपअधीक्षक यादवराव पाटील यांच्यासह पारनेरचे पोलिस निरीक्षक शरद जांभळे यांनी अथक प्रयत्न केले. तपासात नराधम आरोपी संतोष लोणकर पीडितेचा काही दिवसांपासून पाठलाग कराराचा, अश्लील शब्द वापरून तिला सोबत चल म्हणायचा, जीवे मारण्याची धमकी द्यायचा, अशी माहिती मिळाली. तसेच गावातील एका टपरीचालकाने संतोष लोणकरने या कृत्याची कबुली आपल्याजवळ फुशारकी मिरवत दिल्याचे सांगितले. दोन सहआरोपींची नावेही सांगितली. 
पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेली हत्यारेही काढून दिली. 

पोलिसांनी हत्यारे आरोपींचे कपडेही जप्त केले. अधिक तपासात आरोपींनी केलेल्या क्रौर्याचा पाढा वाचला. पीडितेवर कॅनॉल चारीच्या पुलाखाली बलात्कार करून तेथेच टाकले होते. तिचे शरीर पूर्ण गाळाने माखलेले होते, एका हातात शाळेची पिशवी अडकवलेली होती. हे हृदयद्रावक दृष्य पाहून सर्वांनाच दु:ख कोसळले. पोलिस निरीक्षक शरद जांभळे यांनी गुन्ह्याचा तपास करून जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. मात्र, सुनावनीला प्रारंभ होत नव्हता. स्थानिक नागरिकांनी बातमीदारांनी या घटनेचा पाठपुरावा केल्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शासनाकडे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची या खटल्यात नियुक्ती करण्याची मागणी केली. त्यानुसार सरकारने निकम यांची नियुक्तीही केली. मात्र, तब्बल दोन वर्षांनंतर म्हणजे कोपर्डी प्रकरणानंतर नियमित सुनावणी सुरू झाली. 
 
या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण ३२ साक्षीदार तपासण्यात आले. खटल्यातील महत्त्वाचे साक्षीपुरावेही सादर करण्यात आले. आरोपी दत्तात्रय शिंदेतर्फे अॅड. परिमल फळे, संतोष लोणकरतर्फे अॅड. अनिल आरोटे, तर मंगेश लोणकरतर्फे राहुल देशमुख, तसेच प्रितेश खराडे यांनी काम पाहिले. या खटल्यातील तिन्ही आरोपी ते तीस ते चाळीस वयोगटातील आहेत. मुख्य आरोपी संतोष सहआरोपी मंगेश लोणकर हे चुलते पुतणे आहेत. त्यांना काय शिक्षा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 
 
फुशारकी आली अंगलट 
नराधमआरोपी संतोष लोणकर सहकाऱ्यांनी पीडितेवर बलात्कार करून तिचा खून केला. त्यानंतरही तो गावातच होता. सायंकाळी गावातील नेहमीच्या टपरीवर तो गेला असता टपरीचालकाने त्याला खुशाली विचारली. त्यावर त्याने सायंकाळी केलेल्या कृत्याची कबुली दिली. खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली, अाता समाधानी आहे, असे म्हणाला. या टपरीचालकानेही न्यायालयात साक्ष नोंदवली होती. तसेच आरोपींनी ज्या दुकानातून स्क्रू-ड्रायव्हर घेतला, त्यानेही साक्ष देताना तो अचूक ओळखला होता. 
 
मैत्रिणीमुळेच उलगडा 
लोणीमावळा येथील पीडितेसाेबत तिचा चुलतभाऊ एक शाळकरी मैत्रीण असायची. काही दिवसांपासून नराधम आरोपी संतोष लोणकर पीडितेला छळत असल्याचे मैत्रिणीनेच पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानेही कबुली देताना हा प्रकार कथन केला. या मैत्रिणीनेही न्यायालयात निर्भीडपणे साक्ष दिली. घटनाक्रम अचूक सांगितला. पीडितेच्या आठवणीने तिचे डोळेही पाणावले. या मैत्रिणीची साक्ष आरोपींना दोषी ठरवण्यात महत्त्वाची ठरली. 
 
परिस्थितीजन्य पुरावेच 
कोपर्डीहत्याकांडाप्रमाणेच लोणी मावळा खटल्यातही कोणीच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हते. मात्र, सरकार पक्षाने सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे सबळ ठरले. तसेच साक्षीदारांची साखळी जोडून गुन्हा सिद्ध करण्यात अॅड. निकम यशस्वी ठरले. अंतिम युक्तिवादातही त्यांनी २४ मुद्दे मांडले. या साक्षीपुराव्यांच्या आधारेच जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी तिन्ही आरोपींना दोषी ठरवले. न्यायालयात आणताना एरवी मुजोर असलेले आरोपींचे चेहरे दोषी ठरल्याचे समजताच खर्रकन पडले. 
 
अण्णांकडून अभिनंदन 
अतिशयक्रूर निर्घृणपणे केलेल्या सामूहिक बलात्कार खून प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक चालावी, याकरिता ज्येष्ठ समासेवक अण्णा हजारे यांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी केली होती. त्यानुसार निकम यांची नियुक्ती झाली त्यांनी खटला चालवला. त्यांच्या प्रखर युक्तिवादामुळे पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे पीडितेला न्याय मिळाला, अशी भावना अण्णांनी व्यक्ती केली. आरोपींना दोषी ठरवल्याचे समजताच त्यांनी फोनवरून अॅड. उज्ज्वल निकम यांचे अभिनंदन केले.

 अन् म्हणे मी नव्हतो 
नराधमआरोपी मंगेश लोणकर हा दुसऱ्या दिवशीही गावातच होता. घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांसह तोही रस्त्यावर उतरला होता. आरोपींना फाशीच झाली पाहिजे, असे म्हणत होता. गावातील आरोपी असल्याच्या शंकेमुळे ग्रामस्थांनी पोलिसांसमोर कपडे काढले. त्यावेळी मात्र तो कावराबावरा झाला. तो मी नव्हेच असे सांगत कपडे काढण्यासही त्याने नकार दिला. त्याचे कपडे काढले असता त्याच्या शरीरावर ओरखडे जखमा दिसल्या. त्यामुळे तोच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. 
बातम्या आणखी आहेत...