आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर- महात्मा फुले यांच्या विचाराची समाजाला गरज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त श्रीसावताश्रम शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यामंदिरच्या वतीने माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. - Divya Marathi
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त श्रीसावताश्रम शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यामंदिरच्या वतीने माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
नगर- संपूर्ण कुटुंबाला सुशिक्षित करण्यासाठी स्त्री शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे फुले दाम्पत्याला समजले होते. त्यामुळेच त्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. पुण्यात स्त्री शिक्षणाची पहिली शाळा त्यांनी उघडली. त्यांच्या कार्याचा वसा अनेकांनी पुढे चालवला. महात्मा फुले यांचे कार्य समाजासाठी दीपस्तंभासारखे आहे. महिला हीच समाजाची खरी अर्धांगिनी आहे. त्यामुळेच महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे, असे प्रतिपादन नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केले. 
 
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त श्रीसावताश्रम शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यामंदिरच्या वतीने माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष नगरसेवक बाळासाहेब बोराटे, प्रा. रंगनाथ डागवाले, परेश लोखंडे, रावसाहेब काकडे, संजय चौरे, अनिल शिंदे, घोलप, खराडे, गोटीपामूल, चौधरी आदींसह मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते. 
 
बोराटे म्हणाले, महात्मा फुले यांनी केवळ स्त्री शिक्षणाचा पायाच रचला नाही, तर स्त्रियांवर होणारे अन्याय, अत्याचार थांबवण्याचे प्रयत्न केले. सती प्रथा, बालविवाह, भ्रूणहत्या अशा अनेक प्रथा समाजात रुढ होत्या, त्या नष्ट होण्यासाठी प्रयत्न केले. समाजाचे प्रबोधन आणि दलित मुक्तीचा प्रचार हे फुले यांच्या चळवळीचे प्रमुख अंग होते. फुले यांच्या विचारांची आज समाजाला गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महात्मा फुले जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेचे बोराटे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. 
 
शिक्षणाचीज्ञानगंगा सर्वांपर्यंत पोहोचवली... 
शिक्षणाची ज्ञानगंगा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनीच सर्वांपर्यंत पोहोचवली. समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी शिक्षण ही महत्त्वाची गरज त्यावेळेस महात्मा फुले यांनी ओळखली. शिक्षणाचे खरे उद्धारक त्यांनाच म्हणावे लागेल, असे प्रतिपादन माळीवाडा तरूण मंडळाचे अध्यक्ष दत्ता जाधव यांनी केले. माळीवाडा तरुण मंडळाच्या वतीने थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास माजी नगरसेवक विष्णूपंत म्हस्के बजरंग भुतारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष दत्ता जाधव, सावता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बनकर, शहराध्यक्ष नितीन डागवाले, अंबादास गारुडकर, प्रवीण जाधव, भाऊसाहेब फुलसौंदर, गिरीश रासकर, शेरकर, परेश लोखंडे, राजश्री मांढरे यांच्यासह माळीवाडा तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व केले... 
महात्मा फुले यांनी इंग्रज काळात शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व केेले होते. शेतकऱ्यांना बिनव्याजी पतपुरवठा, करसवलत, सिंचनासाठी व्यवस्था, बाजार व्यवस्थेत संरक्षण, कृषी शिक्षणाची आवश्यकता आदी विषय पटवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सरकार, नोकरशाही, सावकारी आणि बाजार व्यवस्थेत होणारी लूट थांबवण्याचे मुद्दे वारंवार उपस्थित केले, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष अभिजित वाघ यांनी केले. 
 
माळी वाड्यातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास मराठा सेवा संघ, मखदुम सोसायटी, अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळ क्रांतीसिंह नाना पाटील कामगार संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी राजूभाई शेख, आबीद खान, संजय घुले, आसिफ खान, शफाकत सय्यद, बहिरनाथ वाकळे, अभिजित वाघ, दत्ता वडवणीकर, रोहित वाळके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

वाघ म्हणाले, महात्मा फुले हे थोर समाज सुधारक, समाज हितचिंतक श्रेष्ठ कृतिशिल होते. समाजातील विषमता, जातीभेद, वर्ण, द्वेष, गुलामगिरी या कर्मठ प्रवृत्तीशी त्यांनी लढा दिला. दीनदुबळ्यांचा विकास शिक्षणाशिवाय होणार नाही, हे त्यांनी ओळखले होते. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. स्वत:ची पत्नी सावित्रीबाईंना शिकवून त्यांना शिक्षिका केले. यावेळी बहिरनाथ वाकळे, आसिफ खान आदींनीही मनोगत व्यक्त केले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...