आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साचलेल्या कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावा, स्वच्छतेची पाहणी करताना महापौर सुरेखा कदम यांचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महापौर सुरेखा कदम यांनी बुधवारी सकाळी अधिकारी पदाधिकाऱ्यांसह शहरातील विविध भागांत साचलेल्या कचऱ्याची पाहणी केली. - Divya Marathi
महापौर सुरेखा कदम यांनी बुधवारी सकाळी अधिकारी पदाधिकाऱ्यांसह शहरातील विविध भागांत साचलेल्या कचऱ्याची पाहणी केली.
नगर - थकीत पगार पेन्शनच्या मागणीसाठी सफाई कर्मचाऱ्यांनी कचरा उचलण्याचे काम बंद केले होते. आता या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न सुटला असून त्यांनी कामास सुरुवात केली आहे. शहर उपनगरात सायंकाळी पर्यंत सर्व स्वच्छतेचे काम झाले पाहिजे, असे आदेश महापौर सुरेखा कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बुधवारी सकाळी दिले. 
 
महापालिका कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे शहरातील कचरा संकलनाचा प्रश्न गंभीर झाला होता. या पार्श्वभूमीवर महापौर कदम यांनी मनपा अधिकारी पदाधिकाऱ्यांसह बुधवारी सकाळी वाजता शहराच्या विविध भागात साचलेल्या कचऱ्याची पाहणी केली. यावेळी प्रभारी आयुक्त विलास वालगुडे, स्थायी समितीचे सभापती सचिन जाधव, सभागृहनेते अनिल शिंदे, नगरसेविका सुवर्णा जाधव, वीणा बोज्जा, नगरसेवक दत्ता कावरे, बाळासाहेब बोराटे, मनोज दुलम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, दत्ता जाधव, प्रभाग अधिकारी मिलिंद वैद्य, जितेंद्र सारसर आदी उपस्थित होते. 

कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे महापालिकेचे कामकाज सुमारे चार दिवस बंद होते. आराेग्य विभागाचे सफाई कर्मचारीही आंदोलनात सहभागी झाल्याने शहरातील कचरा संकलनाचा प्रश्न निर्माण झाला होता. बाजारपेठ, उपनगरे, प्रमुख रस्ते, तसेच अंतर्गत रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचले होते. यासंदर्भात विरोधकांनी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनही केले. कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न सुटल्याने त्यांनी आंदोलन मागे घेत कामकाज सुरू केले. महापौर कदम यांनी शहराच्या विविध भागात साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची पाहणी करून तातडीने त्याची विल्हेवाट लावण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. महापालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपले काम प्रामाणिकपणे केले, तर मोर्चे काढण्याची वेळ नागरिकांवर येणार नाही. शहराच्या विविध भागांत साचलेला कचरा सायंकाळी पर्यंत उचला, साचलेला कचरा तातडीने वाहून नेण्याची व्यवस्था करा, असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून ठप्प झालेल्या कचरा संकलनाच्या कामास गती मिळणार आहे. 
 
आंदाेलनाने प्रश्न सुटत नाहीत 
- महापालिका प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. मोर्चे, आंदोलने करून प्रश्न सुटत नाहीत. शासनाकडे महापाैरांसह सर्वच पदाधिकारी थकीत अनुदानासाठी पाठपुरावा करत आहेत. अद्याप अनुदान मिळाले नसले, तरी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारासाठी तोडगा काढण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांनी आता आंदोलन मागे घेतले असून बाजारपेठेसह इतर भागात साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे कामही सुरू झाले आहे.
’’ सचिनजाधव, सभापती, स्थायी समिती. 

अत्यावश्यक सेवा सुरू ठेवा 
- महापालिका कर्मचाऱ्यांनी थकीत पगारासाठी आंदोलन केले. या आंदोलनात आरोग्य विभागातील कर्मचारीही सहभागी झाले होते. आरोग्य विभाग अत्यावश्यक सेवा देतो. त्यामुळे अांदोलन काळातही हा विभाग सुरूच राहिला पाहिजे. मात्र, तसे झाल्याने शहरातील साफसफाईचा प्रश्न निर्माण झाला. महापालिका कर्मचाऱ्यांनी यापुढे आंदोलनकाळात अत्यावश्यक सेवा बंद राहणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
'' अनिल शिंदे, सभागृहनेते. 
बातम्या आणखी आहेत...