आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्री राम शिंदे यांच्या पुतळ्याचे दहन, पाडोशी परिसरातील ग्रामस्थांचा रास्ता रोको

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले - तालुक्यातील पाडोशी येथे पोलिस बाळाचा वापर करून आवर्तन सोडण्यावरून आदिवासींना धमकवल्याप्रकरणी पाडोशी परिसरातील ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी पालकमंत्री राम शिंदे यांच्या पुतळ्याचे दहन केले. 
 
अकोले तालुक्यातील पाडोशी लघु पाटबंधारे प्रकल्पातून शेती पिण्यासाठी पाणी सोडावे यासाठी कार्यकारी अभियंता तहसीलदार यांना जानेवारी फेब्रुवारीत मागणी केली होती. यासंदर्भात आढळा विभागातील सावरगावपाट, समशेरपूर, टाहकरी केळीसांगवी येथील ग्रामपंचायतने ठराव करून पत्र देऊनही जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या सल्ल्याने मर्जी संपादन करण्यासाठी जाणीवपूर्वक वेळ काढूपणा केला. यामुळे आदिवासी बांधव लाभक्षेत्रातील शेतकरी यांच्यात संघर्ष पेटत गेला आहे. त्यास सर्वस्वी कार्यकारी अभियंता किरण देशमुख हेच जबाबदार आहेत, असा आरोप समशेरपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे, अगस्ती साखर कारखान्याचे संचालक महेश नवले जि. प. पंचायत समिती सदस्यांनी केली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...