आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालकमंत्र्यांकडून गोळीबारात जखमी झालेल्या शेतकऱ्यांची विचारपूस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जखमी शेतकऱ्यांची चौकशी करताना पालकमंत्री राम शिंदे. - Divya Marathi
जखमी शेतकऱ्यांची चौकशी करताना पालकमंत्री राम शिंदे.

नगर- गोळीबारात जखमी झालेल्या शेतकऱ्यांची पालकमंत्री राम शिंदे यांनी घटनेच्या पाचव्या दिवशी भेट घेतली. शेवगाव तालुक्यातील घोटण-खानापूर येथे ऊसदरासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात हे शेतकरी जखमी झाले होते. शिंदे यांनी सावेडीतील मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये जाऊन या शेतकऱ्यांची विचारपूस केली. 


पालकमंत्री शिंदे यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्याची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी विश्वजीत माने, जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, साखर सहसंचालक संगीता डोंगरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे आदी उपस्थित होते. मंत्री शिंदे यांनी यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशीही या घटनेबाबत चर्चा केली. 

बातम्या आणखी आहेत...