आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार मोनिका राजळेंच्या अनुपस्थितीने अस्वस्थता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी- लोकनेते गोपीनाथ मुंडे, राजीव राजळे यांच्या जयंतीनिमित्त लिटल चॅम्प अंजली नंदिनी गायकवाड भगिनींच्या स्मृतिगंध कार्यक्रमाला शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तथापि, आमदार मोनिका राजळे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली आहे. 


राजीव राजळे मित्रमंडळाने जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम आयोजित केले. आमदार मोनिका यांनी दु:खातून बाहेर पडून राजकारण समाजकारणात सक्रीय व्हावे, यासाठी हिंमत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मागील आठवड्यात कार्यकर्त्यांनी कासार पिंपळगावला जाऊन मोनिका राजळेंना सप्ताहात सहभागी होण्याची विनंती केली होती. सकारात्मक मान डोलावत त्यांनी येण्याचे मान्यही केले होते. त्यामुळे त्या कार्यक्रमाला निश्चित उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. कार्यक्रमाच्या सुरवातीला राजीव राजळेंच्या जीवनावर व्हिडीओ दाखवण्यात आला. मुख्य गायनाचा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी राजळे कुटुंबातील जि. प. सदस्य राहुल राजळे, नेवाशाच्या सभापती सुनीता गडाख आल्या. आमदार मोनिका येणार नसल्याचे लक्षात येताच काही कार्यकर्ते महिला कार्यक्रम सोडून गेल्या. 


आमदार मोनिका राजळे यांच्याबाबत शहर तालुक्यात सहानुभूती निर्माण झाली असून त्या राजकारण समाजकारणात कधी सक्रीय होतात याकडे लक्ष लागले आहे. हिंमत सप्ताहाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याबरोबरच त्यांनी बाहेर पडावे, यासाठी कार्यकर्त्यांकडून विनंती केली जात आहे. स्मृतिगंध कार्यक्रमास अादिनाथ महाराज, झिंजुर्के महाराज, भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, सोमनाथ खेडकर, उपसभापती विष्णूपंत अकोलकर, गटनेते सुनील ओव्हळ, पुरूषोत्तम आठरे, रवींद्र वायकर, सभापती रमेश गोरे, नामदेव लबडे, दीपाली बंग, पं. स. सदस्य मनीषा वायकर, रामकिसन काकडे, संचालक सुभाष ताठे, तहसीलदार नामदेव पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन वीणा दिघे राजीव सुरवसे यांनी केले. 

बातम्या आणखी आहेत...