आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेतकरांनी विकासकामांची मुहूर्तमेढ रोवली : आमदार संग्राम जगताप यांचे प्रतिपादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- केडगावमध्ये पूर्वी ग्रामपंचायत होती. ग्रामपंचायतीचा महापालिकेत समावेश करण्यात आला. नागरी वस्ती वाढत गेली. त्या अनुषंगाने प्रश्न वाढत गेले. संदीप कोतकर यांना महापौरपदाची संधी मिळाली. त्यांनी या संधीचे सोने केले. विकासकामांचा ठसा त्यांनी केडगावमध्येच नव्हे, तर नगर शहरात उमटवला. विकासकामांची मुहूर्तमेढ संदीप कोतकर यांनीच रोवली, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. 

केडगावमधील श्रीकृष्णनगर येथे अंतर्गत रस्ते बंद पाइपगटार कामाचा शुभारंभ करताना जगताप बोलत हाेते. याप्रसंगी माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर, नगरसेविका सविता कराळे, सुनीता कांबळे, सुनील कोतकर, जालिंदर कोतकर, माजी नगरसेवक सुनील कोतकर, अशोक कराळे, प्रभाकर गुंड, महेंद्र कांबळे, सुनील उमाप, विशाल कोतकर, जयद्रथ खाकाळ, बाबासाहेब कोतकर, शशिकांत आठरे, अनिल ठुबे अादी उपस्थित होते. 

जगताप म्हणाले, केडगाव पाणी योजनेच्या माध्यमातून कोतकर यांनी सर्वांत मोठा निधी आणला. केडगावकरांना रोज पाणी मिळावे, अशी ही योजना आहे. संदीप कोतकर यांचा विकासाचा वारसा माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी पुढे चालवला आहे. अडचणीत असतानाही केडगावकरांना आधार देण्याचे काम त्या करत आहेत. महिलांसाठी जीम शहरात कुठेच नाही, ती केडगावमध्ये आहे. महापालिकेत सत्ता नाही, तरी काळजी करू नका. केडगावसाठी निधी उपलब्ध करून देण्याची सर्वस्वी जबाबदारी आपली अाहे, असे जगताप यांनी सांगितले. 

माजी उपमहापौर कोतकर म्हणाल्या, केडगावच्या विविध भागांत विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न सर्व नगरसेवक करत आहेत. केडगावचा विकास झपाट्याने होत आहे. त्यानिमित्ताने संदीप कोतकर यांचे स्वप्न साकार होत असल्याचे कोतकर यांनी सांगितले.
 
दरम्यान, केडगाव येथील विकासकामांसाठी पुढील २० वर्षांचा विचार करून आराखडा तयार करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. केडगाव येथे सांस्कृतिक क्रीडा संकुल नाही. मोठे उद्यान उभारणे गरजेचे आहे. नाट्यगृह चित्रपटगृह परिसरात नाही. लोकप्रतिनिधींनी याबाबत सर्वंकष विचार करून ही कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली. 
बातम्या आणखी आहेत...