आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुळा भंडारदरा धरणाच्या पाणलोटात ८५ टक्के पाऊस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भंडारदरा- मुळा भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत सरासरीच्या ८५ टक्के पाऊस नोंदवला गेला. ते २९ ऑगस्टदरम्यान यावर्षी घाटघर रतनवाडी, तसेच हरिश्चंद्रगड परिसरात चार हजारांहून अधिक मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे दोन्ही धरणांत ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे.

तीन ऑगस्टलाच भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे जाहीर करण्यात आले. ११.३९ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या धरणात सध्या १०,५२० दशलक्ष घनफूट पाणीसाठा ठेवून उर्वरित पाणी निळवंडे धरणात सोडले जात आहे. गेल्या महिनाभरात भंडारदरा धरणाच्या विद्युतगृह क्रमांक एकमधून ८२० क्युसेक पाणी सोडले जात आहे. अतिवृष्टीच्या वेळी धरणातून तब्बल २२ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. परिणामी निळवंडेही भरले आहे. निळवंडे धरणाची क्षमता आठ हजार दोनशे दशलक्ष घनफूट आहे.

पावसाळ्याचा एक महिना अजून बाकी असल्याने धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. सध्या दररोज ७२६ दशलक्ष घनफूट पाणी वीजनिमिर्तीकरून बाहेर पडते. विद्युतगृहाद्वारे हजार १६० दशलक्ष घनफूट पाणी सोडले गेले आहे. स्पील वे अंब्रेला फॉलद्वारे यापेक्षा अधिक पाणी गेले आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांतून सुमारे ६३ हजार, कर नगर जिल्ह्यातील धरणांतून १० हजार दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीत गेलेे. सध्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा ६३ टक्के झाला आहे.

धरणांतीलपाणीसाठा (आकडेदशलक्ष घनफुटांत) : मुळा : २५ हजार ३००, भंडारदरा : १० हजार ५३३, निळवंडे हजार ६४१. आतापर्यंतचा पाऊस (आकडे मिलिमीटरमध्ये) : भंडारदरा : १५१०, घाटघर : ४१००, रतनवाडी : ४२९०, पांजरे : ३२००, वाकी : २२६५.

‘जायकवाडी’चे नियोजन नाही
जायकवाडी धरणात सध्या मृतसाठा वगळता ४० हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. मात्र, पाणी वापराबाबत तेथे नियोजन नसल्याचे आतापर्यंतच्या वापरावरून लक्षात येते, अशी माहिती एका वरिष्ठ पाटबंधारे अधिकाऱ्याने दिली. पूर्वी धरण भरल्यानंतर पाणी वापराचे तीन वर्षांचे नियोजन करण्यात येत होते. आता तसे करणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

वाळू व्यावसायिकांना ‘अच्छे दिन’
गेल्यादोन वर्षांत गोदावरी, मुळा प्रवरा नद्या वाहत्या झाल्या नसल्याने वाळूची प्रचंड कमतरता भासत होती. या वर्षी या नद्या वाहत्या झाल्या आहेत. त्यामुळे पात्रात वाळू मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाळूसम्राटांना ‘अच्छे दिन’ आले असल्याची माहिती एका वाळू वाहतूकदाराने दिली.

भंडारदरा-मुळाभंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत सरासरीच्या ८५ टक्के पाऊस नोंदवला गेला. ते २९ ऑगस्टदरम्यान यावर्षी घाटघर रतनवाडी, तसेच हरिश्चंद्रगड परिसरात चार हजारांहून अधिक मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे दोन्ही धरणांत ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे.

तीन ऑगस्टलाच भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे जाहीर करण्यात आले. ११.३९ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या धरणात सध्या १०,५२० दशलक्ष घनफूट पाणीसाठा ठेवून उर्वरित पाणी निळवंडे धरणात सोडले जात आहे. गेल्या महिनाभरात भंडारदरा धरणाच्या विद्युतगृह क्रमांक एकमधून ८२० क्युसेक पाणी सोडले जात आहे. अतिवृष्टीच्या वेळी धरणातून तब्बल २२ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. परिणामी निळवंडेही भरले आहे. निळवंडे धरणाची क्षमता आठ हजार दोनशे दशलक्ष घनफूट आहे.

पावसाळ्याचा एक महिना अजून बाकी असल्याने धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. सध्या दररोज ७२६ दशलक्ष घनफूट पाणी वीजनिमिर्तीकरून बाहेर पडते. विद्युतगृहाद्वारे हजार १६० दशलक्ष घनफूट पाणी सोडले गेले आहे. स्पील वे अंब्रेला फॉलद्वारे यापेक्षा अधिक पाणी गेले आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांतून सुमारे ६३ हजार, कर नगर जिल्ह्यातील धरणांतून १० हजार दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीत गेलेे. सध्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा ६३ टक्के झाला आहे.

धरणांतीलपाणीसाठा (आकडेदशलक्ष घनफुटांत) : मुळा : २५ हजार ३००, भंडारदरा : १० हजार ५३३, निळवंडे हजार ६४१. आतापर्यंतचा पाऊस (आकडे मिलिमीटरमध्ये) : भंडारदरा : १५१०, घाटघर : ४१००, रतनवाडी : ४२९०, पांजरे : ३२००, वाकी : २२६५.

नुकसानीची भरपाई नाही
अतिवृष्टीमुळे अनेक घरांचे नुकसान झाले. भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील गावांना सर्वाधिक फटका बसला. घाटघर, साम्रद, रतनवाडी, शिंगणवाडी, मुरशेत, पांजरे, उडदावणे, लव्हाळवाडी, कोलटेंभे, मुतखेलमधील भातशेती उद्ध्वस्त झाली. शेतांचे बांध वाहून गेल्यानेे रोपांचे नुकसान झाले आहे. मात्र, शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही.
बातम्या आणखी आहेत...