आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत लाखांचे कवच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्वानंतर त्यांच्या कुटुुंबीयांना दोन लाख रुपयांचे विम्याचे कवच देणारी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लागू करण्यास सरकारने मान्यता दिली आहे.
सन २००५-०६ मध्ये राज्य सरकारने शेतकरी व्यक्तिगत विमा योजना लागू केली होती. सन २००९-१० पासून या योजनेचे नाव "शेतकरी जनता अपघात विमा' असे करण्यात आले. हीच योजना आता "गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना' या नावाने लागू करण्यात आली असून नुकसानभरपाईची रक्कम वाढवण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सात-बारावरील नोंदीप्रमाणे १० ते ७५ वयोगटातील प्रत्येक सभासदाच्या विमा हप्त्याची रक्कम सरकारने प्रत्येकी १९ रुपये ८९ पैसे एकरकमी भरले आहेत. सन २०१५-१६ साठीची ही रक्कम असून नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडून ही योजना राबवण्यात येत आहे. बजाज कॅपिटल इन्शुरन्स ब्रोकिंग लिमिटेड या कंपनीस विमा सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अपघाती मृत्यू, दोन डोळे अथवा दोन अवयव, एक डोळा एक अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपये, तर एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येईल.
बातम्या आणखी आहेत...