आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘फेज टू’साठी दिवसभर काथ्याकूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापौर सुरेखा कदम यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दिवसभरात दोन महासभा झाल्या. दोन्ही सभेत शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या (फेज टू) कामाबाबत सत्ताधारी विरोधकांनी दिवसभर काथ्याकूट केला. योजनेच्या कामासाठी २९ कोटी रुपयांच्या कर्जाचा प्रस्ताव सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. परंतु प्रस्तावातील त्रुटींमुळे हा विषय प्रलंबित ठेवण्यात आला. अमृत योजनेच्या कामासाठी आलेली तापी प्रिस्टेज या संस्थेची निविदा रद्द करणे महिला बालकल्याण समिती विसर्जित करण्याचा प्रस्ताव सभेत मंजूर करण्यात आला.
महापौर कदम यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता पहिली सभा सुरू झाली. या सभेत धार्मिक स्थळांबाबत सत्ताधारी विरोधकांनी सविस्तर चर्चा केली. प्रशासनाने केलेला धार्मिक स्थळांचा सर्व्हे चुकीचा असल्याचा आरोप सत्ताधारी विरोधी नगरसेवकांनी केला. प्रशासनाने देखील हा आरोप मान्य करत सर्व्हेतील त्रुटी दूर करण्याचे मान्य केले. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २९ सप्टेंबर २००९ नंतर उभारण्यात आलेल्या धार्मिक स्थळांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. परंतु या नोटिसा बजावताना महापालिका प्रशासनाने संबंधित धार्मिक स्थळांचे विश्वस्त आजूबाजूच्या नागरिकांना कल्पना दिली नाही. त्यामुळे धार्मिक स्थळांचा पुन्हा सर्व्हे करावा, अशी मागणी सभागृहाने केली. परंतु धार्मिक स्थळ २००९ पूर्वीचे आहे, असा पुरावा जोपर्यंत संबंधित देत नाहीत, तोपर्यंत आमच्या हातात काहीच नसल्याचे प्रशासनाने सभागृहात स्पष्ट केले. पुरावे सादर करण्यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. प्रशासन ३० नोव्हेंबरला अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी न्यायालयासमोर सादर करणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत या धार्मिक स्थळांवर कारवाई होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान, पहिली सभा संपल्यानंतर दुपारी दुसरी सर्वसाधारण सभा सुरू झाली. यात ‘फेज टू’साठी कर्ज घेण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. मात्र, प्रशासनाने सादर केलेल्या या प्रस्तावात अनेक त्रुटी होत्या. कर्ज घेण्यासाठी कोणत्या मालमत्ता तारण ठेवणार, कर्जाच्या रकमेतून कोणती कामे करणार, तारण ठेवलेल्या मालत्तांचे मूल्यांकन केले का? असे प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले. हा प्रस्ताव फेरसादर करण्याची मागणी विरोधकांनी केली. महापौरांनी मात्र यासंदर्भात सर्वपक्षीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेऊन हा विषय प्रलंबित ठेवला. त्यानंतर ‘अमृत’च्या कामासाठी आलेली तापी संस्थेची निविदा रद्द करणे, महिला बालकल्याण समिती विसर्जित करण्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
दीप चव्हाण : ‘फेज टू’चेवाटाेळे ज्या तापी संस्थेने केले, त्याच संस्थेसाठी कर्ज काढण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येत आहे, हे दुर्दैव आहे. फेज टू च्या कामासाठी कर्ज घेण्याच्या प्रस्तावाची देखील चव्हाण यांनी चिरफाड केली. प्रस्तावात अनेक त्रुटी असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

गणेश भाेसले : िकरकोळखर्चाविना वाहने बंद आहेत. या वाहनांची दुरुस्ती करण्याऐवजी भाडेतत्त्वावर वाहने घेऊन लाखो रुपयांची उधळपट्टी प्रशासन करत असल्याचा आरोप भाेसले
यांनी केला. यावर एकाही अधिकाऱ्याने समाधानकारक उत्तर दिले नाही.

अनिल शिंदे : शहरातीलघनकचऱ्यासाठी आलेली निविदा अटी- शर्तीत बसत नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर संतप्त शिंदे यांनी अधिकाऱ्याची कानउघाडणी करत अटी तुमच्या की निविदेमधील? असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला.

कैलास गिरवले : नेहरूमार्केटची जागा नगरसेवकाच्या नातेवाईकाला देण्यात येणार असल्याचा आरोप नगरसेवक दत्ता कावरे यांनी केला. कावरे यांनी त्या नगरसेवकाचे नाव जाहीर करावे, अशी मागणी गिरवले यांनी केली. कावरे यांनी मात्र योग्य वेळी नाव जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले.

अजय चारठाणकर : जोपर्यंतधार्मिक स्थळांबाबत महापालिका प्रशासनाला पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत काहीच करता येणार नाही. संबंधितांनी धार्मिक स्थळ २००९ पूर्वीचे असल्याचा पुरावा २५ नोव्हेंबरपर्यंत द्यावा.

कुमार वाकळे : प्रशासनानेधार्मिक स्थळांचा चुकीचा सर्व्हे केला आहे. त्यामुळे नागरिकांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत. प्रशासनाने चुकीच्या पध्दतीने कोणत्याही मंदिराच्या विटेला जरी हात लावला, तर महापालिकेच्या नगररचना विभागावर जेसीबी फिरू.
कोण काय म्हणाले?
उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या वाढदिवसानिमित्त सभागृहाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

खड्डे पॅचिंग कामाचे कौतुक
खड्ड्यांच्या प्रश्नावरून सभेत विरोधक पुन्हा आक्रमक झाले होते. शहरातील खड्डे बुजले, परंतु उपनगरांतील खड्ड्यांचे काय? असा सवाल नगरसेवक संपत बारस्कर यांनी उपस्थित केला. खड्ड्यांच्या प्रश्नावर विरोधकांना उत्तर देण्यासाठी सत्ताधारी देखील तयारीतच आले होते. रस्त्यांची पूर्वीची आताची स्थिती दर्शवणारे फलकच सत्ताधाऱ्यांनी सभागृहात दाखवले. त्यानंतर हा वाद मिटल्यानंतर काही वेळाने नगरसेवक गणेश भोसले यांनी खड्डे पॅचिंगच्या कामाचे कौतुक करत महापौर कदम यांचे अभिनंदन केले.

तुझं-माझंनकोच
फेज टू योजनेच्या कामासाठी कर्ज घेण्याच्या प्रस्तावास विरोधकांनी तीव्र विरोध केला. उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्यासह १७ नगरसेवकांनी विरोध दर्शवला. सभागृहनेते अनिल शिंदे, स्थायीचे सभापती सचिन जाधव, ज्येष्ठ नगरसेवक अभय आगरकर यांनी मात्र कर्जाच्या प्रस्तावाचे समर्थन केले. माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी देखील प्रस्तावास विरोध केला. फेज टू ची तुमच्यापेक्षा आम्हाला घाई आहे, फेज टू साठी माझं-तुझं नकोच, आमचा विरोध फेज टू ला नाही, कर्जाच्या चुकीच्या प्रस्तावास असल्याचे कळमकर यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...