आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपाच्या तिजोरीत सव्वासात कोटींचा कर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - केंद्र सरकारचा नोटाबंदीचा निर्णय महापालिकेच्या पथ्यावर पडला आहे. बारा दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत सुमारे सवा सात कोटींचा मालमत्ता कर जमा झाला आहे. सरकारच्या निर्देशानुसार महापालिका २४ नोव्हेंरच्या मध्यरात्रीपर्यंत पाचशे, हजार रुपयांच्या नोटा मालमत्ता करापोटी स्वीकारणार आहे. शेवटच्या तीन दिवसांत करापोटी मोठी रक्कम जमा होईल, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे.
महापालिकेचे उत्पन्नाचे सर्व स्त्रोत बंद झाल्याने मालमत्ता कराची थकबाकी वसूल करणे आवश्यक झाले आहे. परंतु वेळोवेळी नोटिसा बजावूनही थकबाकीदार पैसे भरण्यास तयार नाहीत. काही दिवसांपूर्वीच महापालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी वसुलीसाठी रस्त्यावर उतरले होते. काही थकबाकीदारांच्या मालमत्तांना या अधिकाऱ्यांनी सील ठोकले होते. थेट जप्तीची कार्यवाही करूनही थकबाकीदार पैसे भरण्यास पुढे येत नसल्याने महापालिका प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाने महापालिका प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. बंद झालेल्या पाचशे हजार रुपयांच्या नोटा २४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत स्वीकारण्याचे निर्देश सरकारने सर्वच महापालिकांना दिले. सरकारचे हे निर्देश महापालिका प्रशासनासाठी चांगलेच फायद्याचे ठरले. दहा-बारा दिवसांत महापालिकेच्या ितजोरीत सुमारे सात कोटींचा कर जमा झाला. चलनातून बंद झालेल्या या नोटा नागरिकांनी रांगा लावून महापालिकेत भरल्या. शेवटच्या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात कर जमा होईल, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे.
बातम्या आणखी आहेत...