आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरची हरसिमरनकौर परदेशात करणार देशाचे प्रतिनिधित्व, पाहा Photo

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडील किशोरसिंग, आई सुधीरकौर यांच्याबरोबर हरसिमरनकौर - Divya Marathi
वडील किशोरसिंग, आई सुधीरकौर यांच्याबरोबर हरसिमरनकौर
नगर- ती एकुलती एक. वडिलांचे पंक्चरचे दुकान. घरची आर्थिक परिस्थिती तशी गरिबीची. पण तिला लष्करात अधिकारी बनवण्याचे वडिलांचे स्वप्न. महाविद्यालयात एनसीसी घेऊन तिने त्या दृष्टीने पहिले पाऊलही टाकले आहे. याच एनसीसीच्या माध्यमातून ती आता भारताचे परदेशात सांस्कृतिक प्रतिनिधित्व करणार आहे.

नगरच्या तारकपूर भागातील हरसिमरनकौरची ही यशोगाथा आहे. तिचे वडील किशोरसिंग खुराणा यांचे टायर पंक्चरचे घड्याळ दुरुस्तीचे दुकान आहे. देशाच्या फाळणीनंतर पाकिस्तानातून आलेली पंजाबी सिंधी कुटुंबे तारकपूर भागात स्थायिक झाली आहेत. खुराणा कुटुंबही त्यातलेच एक. किशोरसिंग सुधीरकौर खुराणा यांची हरसिमरनकौर ही एकुलती एक मुलगी. जेमतेम आर्थिक परिस्थिती असताना त्यांनी मुलीला तिच्या आयुष्यात काही तरी वेगळे करण्याची जिद्द दिली. अहमदनगर महाविद्यालयात ती दुसऱ्या वर्षाला आहे. पहिल्या वर्षातच तिने एनसीसीत प्रवेश घेतला. तिची कामगिरी अतिशय चमकदार आहे. या वर्षी तिने प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातही
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.
त्यानंतर हरसिमरन कौरकौरची ‘यूथ एक्स्चेंज प्रोग्राम’ अंतर्गत परदेशात जाण्यासाठी निवड झाली आहे. गुणवत्ता यादीत तिचे नाव आले आहे. ती कोणत्या देशात जाणार याची यादी अद्याप यायची आहे. त्यासाठी तिला खूप कष्ट करावे लागले. आधी तिची लेखी परीक्षा झाली. त्यात सामान्यज्ञान एनसीसीचे विषय होते. त्यानंतर नकाशा वाचन, संचलन, नेतृत्व आदींबाबत चाचण्या झाल्या. या शिवाय मुलाखत समूह चर्चा होऊन तिची निवड झाल्याचे तिला कळवण्यात आले आहे. राज्यातून ११ जणांची निवड झाली आहे. त्यात नगरमधून दोघे आहेत. दोघेही नगर कॉलेजचेच आहेत.
असाअसेल कार्यक्रम
हरसिमरतकौरला रशिया, कझाकस्तान, श्रीलंका, भूतान, बांग्लादेश, नेपाळ. मालदीव, व्हिएतनाम सिंगापूर या देशांपैकी एका देशात जाण्याची संधी मिळेल. हा दौरा १५ ते २० दिवसांचा असेल. त्याआधी दहा दिवस दिल्लीत निवडण्यात आलेल्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. परदेशात गेल्यावर तेथील संस्कृतीची माहिती घेणे त्यांना आपल्या संस्कृतीची माहिती देण्याचे काम हे दूत करतील. प्रत्येक राज्यातून सुमारे ११ विद्यार्थ्यांची या कार्यक्रमाअंतर्गत निवड झाली असल्याचे हरसिमरन कौरने सांगितले.
नृत्य, अिभनय, क्रीडाप्रकारांमध्येही कौशल्य
हरसिमरनकौर एकीकडे एनसीसीचा खडतर अभ्यासक्रम पूर्ण करत आहे, पण दुसरीकडे ती नृत्यातही निपूण आहे. तीे भरतनाट्यम शिकली आहे. एनसीसीद्वारे जेथे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, त्यावेळी ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना तिने अनेकवेळा बहारदार लावणी नृत्य सादर करून वाहवा मिळवली आहे. या शिवाय ती स्केटिंग, अश्वरोहण, कबड्डी, खोखो, पोहणे, अभिनयातही तिचे कौशल्य जबरदस्त आहे.
लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्न
लष्करातअधिकारी होण्याच्या जिद्दीनेच एनसीसीत प्रवेश घेतला आहे. लष्करी जीवनाची पूर्वकल्पना त्यामुळे आली आहे. मला हे जीवन खूप आवडते. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ‘ग्रॅज्युएट ऑफिसर’या पदासाठी मी प्रयत्न करणार आहे.'' हरसिमरनकौर खुराणा.
पुढीस स्लाइड्सवर पाहा, तिचे खास फोटो...
बातम्या आणखी आहेत...