आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पुन्हा पणाला, निवडणूक ठरणार महापौर निवडणुकीची रंगीत तालीम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- प्रभाग क्रमांक मधील जागेसाठी रविवारी मतदान होत आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या प्रभागात राष्ट्रवादीने पुन्हा एकदा आपली ताकद पणाला लावली आहे. प्रभाग ११ मधील चुरशीच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला होता. आता प्रभाग मधील जागेसाठी राष्ट्रवादी मैदानात उतरली आहे. परंतु शिवसेनेच्या सर्वच वरिष्ठांनी प्रभागात तळ ठोकल्याने राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक पुन्हा एकदा डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
प्रभाग क्रमांक चे शिवसेना नगरसेवक विजय भांगरे यांचे हृदयविकाराने निधन झाल्याने या जागेसाठी रविवारी पोटनिवडणूक होत आहे. भांगरे यांच्या पत्नी प्रतिभा या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.

दोन वर्षांपूर्वी विजय भांगरे यांनी काँग्रेसचे संजय ठाेंबरे यांचा सुमारे दीड हजार मतांनी पराभव केला होता. या पोटनिवडणुकीत काँग्रेस ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक रिंगणात उतरली आहे. राष्ट्रवादीचे कृष्णा गायकवाड, शिवसेनेच्या प्रतिभा भांगरे अपक्ष उमेदवार अनिता दळवी यांच्यात थेट लढत होणार आहे. परंतु प्रभाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो. त्यात शिवसेनेच्या उमेेदवार भांगरे यांना मतदारांकडून सहानुभूती मिळणार आहे.
विजय भांगरे यांनी प्रभागात कमी वेळात नागरिकांशी चांगले संबंध निर्माण केले होते. शिवाय शिवसेनेने सर्व ताकद प्रतिभा भांगरे यांच्या पाठीशी उभी केली आहे. निवडणुकीत सुमारे १० हजार ७२६ नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे. शिवसेना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रभागात आठ दिवसांपासून तळ ठोकला आहे. महापौर निवडणूक अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. शिवसेनेकडून उपनेते तथा माजी आमदार अनिल राठोड, संपर्क नेते भाऊ कोरगावकर, ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यासह सर्वच नगरसेवक प्रचारात होते. राष्ट्रवादीचे उमेदवार गायकवाड यांच्या प्रचारासाठी आमदार अरुण जगताप, संग्राम जगताप महापौर अभिषेक कळमकर प्रभागात फिरत होते.

काही दिवसांपूर्वीच प्रभाग ११ १५ मध्ये पोटनिवडणूक झाली. त्यात एका जागेवर शिवसेनेने, तर दुसऱ्या जागेवर राष्ट्रवादीने बाजी मारली. प्रभाग ११ मधील चुरशीची जागा मात्र राष्ट्रवादीला राखता आली नाही.

या जागेच्या पराभवामुळे राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आता प्रभाग मधील जागेसाठीसाठी राष्ट्रवादीने पुन्हा प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मतदार त्यांची ही प्रतिष्ठा जपणार की शिवसेनेच्या उमेदवाराला पुन्हा निवडून देणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

कार्यकर्त्यांचा प्रभागात तळ
प्रभाग मधील एका जागेसाठी रविवारी मतदान होत असून त्यासाठी मनपा प्रशासनाने चोख नियोजन केले आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी ६५ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तब्बल दहा ७२६ नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे. सेना राष्ट्रवादीचे नेते, नगरसेवक कार्यकर्ते शनिवारी रात्री उशिरापर्यंत प्रभागत तळ ठोकून होते. उन्हाचा पारा वाढल्याने मतदारांना रविवारी मतदान केंद्रावर आणण्यासाठी कार्यकर्त्यांची दमछाक होणार आहे. प्रभाग मध्ये दोन्ही नगरसेवक शिवसेनेचे आहेत.

महापौरपदासाठी पोटनिवडणूक महत्त्वाची
महापौर निवडणूक अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपली आहे. त्यासाठी आवश्यक ते संख्याबळ जमवण्यासाठी युती- आघाडी आतापासूनच कामाला लागली आहे. त्यात प्रभाग क्रमांक ११, १५ आताची प्रभाग मधील पोटनिवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. तत्कालीन महापौर संग्राम जगताप यांनी आमदार झाल्यावर महापौरपदाचा राजीनामा दिला. त्या वेळी झालेल्या महापौर निवडणुकीत युतीने आघाडीला जोरदार टक्कर दिली होती. मनसेच्या निर्णायक मतांमुळे राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर महापौर झाले. आता जूनमध्ये होणाऱ्या महापौर निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. महापौर पदावर शिवसेनेसह काँग्रेसनेदेखील दावा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस महापौर निवडणुकीत एकाकी पडण्याची शक्यता आहे. पोटनिवडणूक महापौर पदासाठी महत्त्वाची ठरणार आहे.