आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर: पाच कोटींचा नगरसेवक; निधी कागदोपत्रीच खर्च

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- वर्षभरात सुमारे कोटींचा नगरसेवक स्वेच्छा निधी वॉर्ड विकास निधी खर्च झाला. मात्र, काही नगरसेवकांनी हा निधी खर्च झाल्याचे केवळ कागदोपत्री दाखवले, तर अनेकांनी हा निधी चेंबरच्या झाकणांवर बाकांवरच खर्च केल्याचे समाेर आले. त्यामुळे नगरसेवक निधीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून हा निधी वापरण्यासाठी ठोस नियमावली तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
प्रभागातील विकासकामांसाठी नगरसेवकांना दरवर्षी प्रत्येकी दहा लाख रुपये असा एकूण कोटी रुपयांचा नगरसेवक स्वेच्छा वॉर्ड विकास निधी देण्यात येतो. मागील काही वर्षांपासून हा निधी मिळाल्याने नगरसेवकांनी सभागृहात आरडाओरड करत प्रशासनाला धारेवर धरले. उपायुक्त अजय चारठाणकर यांनी एलबीटीपोटी मिळणाऱ्या अनुदानातून हा निधी उपलब्ध करून दिला. त्यापैकी वर्षभरात सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी खर्च झाला. परंतु हा निधी खर्च करताना कोणतीही ठोस नियमावली नसल्याने अनेक नगरसेवकांनी कागदोपत्री कामे झाल्याचे दाखवत निधी हडप केला. 

एकीकडे प्रभागात विकासकामे होत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे प्रभागासाठी उपलब्ध असलेला निधी नगरसेवकच हडप करत आहेत. परिणामी अनेक प्रभाग विकासापासून वंचित आहेत. चेंबरची झाकणे बसवणे, बसण्यासाठी बाकांची खरेदी, ड्रेनेजची दुरूस्ती, ट्री गार्ड अशा अनेक िकरकोळ कामांवर नगरसेवक निधी खर्च झाल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले. विशेष म्हणजे पाहणी अहवाल तयार करताच अनेक कामांची बिले काढण्यात आली. त्यामुळे नगरसेवक निधीतून पाच कोटी रुपयांचा खर्च झाला असला, तरी प्रत्यक्षात कामेच झाली नसल्याचे अनेक प्रभागांत दिसत आहे. काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या प्रभागात अद्याप एकही काम नगरसेवक निधीतून झाले नसल्याचे एका नगरसेवकाने दैनिक दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. काही नगरसेवक मात्र अपवाद ठरले आहेत. त्यांनी या निधीतून प्रभागात ठोस विकासकामे केली आहेत. 

नगरसेवकांकडून दबावतंत्राचा वापर 
नागरिकांनी३४ प्रभागांतून निवडून दिलेले ६८ स्वीकृत अशा एकूण ७३ नगरसेवकांना प्रत्येकी दहा लाख रुपयांचा स्वेच्छा वॉर्ड विकास निधी दिला जातो. आपल्या निधीतील कामे मंजूर (खतवण्यासाठी) करण्यासाठी नगरसेवक संबंधित विभाग अधिकाऱ्यांवर दबाव आणतात. झालेल्या कामांची बिले काढण्यासाठीदेखील हेच दबावतंत्र वापरण्यात येते. 


३४ एकूण प्रभाग 
६८ एकूण नगरसेवक 
३.५ कोटी स्वेच्छा निधी 
३.५ कोटी वाॅर्ड विकास निधी 
०५ कोटी एकूण निधी खर्च 

पाहणी अहवाल रद्दची मागणी 
नगरसेवकनिधी, तसेच इतर निधीतील कामे मंजूर करताना अथवा या कामांची बिले काढताना बंधनकारक असलेल्या पाहणी अहवालाची अट रद्द करावी, अशी मागणी काही नगरसेवकांनी अायुक्त दिलीप गावडे यांच्याकडे केली आहे. परंतु आयुक्तांनी ही मागणी धुडकावून लावली. केलेल्या कामांची बिले काढल्याचे प्रकार समाेर आले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...