आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिका रुग्णालयातील मनुष्यबळाचा प्रश्न सुटेना, रुग्णालयात दरमहा सुमारे 350 ते 400 मातांची प्रसूती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नगर - विनामूल्य विश्वसनीय सेवेमुळे नावारूपास आलेल्या महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात दरमहा ३५० ते ४०० मातांची प्रसुती होते. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली, तरी रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आयांची संख्या मात्र तोकडी आहे. नगरपालिकेची महापालिका होऊन १३ वर्षे उलटली, तरी हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे रुग्णालयात प्रसूत होणाऱ्या हजारो माता त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 
 
मनपा रुग्णालयात सध्या रुग्णांसह डॉक्टर, नर्स, तसेच आयांची मोठ्या प्रमाणात हेळसांड सुरू आहे. सर्वांत जुने, विश्वसनीय विनामूल्य सेवेसाठी प्रसिध्द असलेल्या या रुग्णालयातील सोयी-सुविधांकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे येथील समस्या कमी होण्याऐवजी त्या अधिक वाढल्या आहेत. खासगी रुग्णालयात सिझेरियनचे पेव फुटले असताना मनपा रुग्णालयातील नैसर्गिक प्रसुतीचे प्रमाण अजूनही कायम आहे. मात्र, आवश्यक यंत्रसामग्री मनुष्यबळाअभावी रुग्णांना सेवा देताना डॉक्टर, नर्स आयांच्या नाकी नव येत आहेत. 
 
रुग्णालयात पुरेसे डॉक्टर कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनासह पदाधिकाऱ्यांकडे अनेकदा मागणी केली गेली. परंतु रुग्णालयाच्या या मागणीला नेहमीच केराची टोपली दाखवण्यात आली. 

रुग्णाला भूल देण्यासाठीदेखील येथील डॉक्टरांना बाहेरच्या भूलतज्ज्ञांवर अवलंबून राहावे लागते. ऐनवेळी भूलतज्ज्ञ उपलब्ध झाल्यास प्रसूत होणाऱ्या मातेची शस्त्रक्रिया थांबवावी लागते. रुग्णालयातील जनरल वॉर्ड प्रायव्हेट रुममध्ये जवळपास ७० ते ८० महिला दररोज उपचार घेतात. परंतु त्यांच्या देखरेखीसाठी रुग्णालयात अवघ्या १२ ते १५ नर्स आहेत. आयांचीदेखील तीच स्थिती आहे. रुग्णांच्या सेवेसाठी केवळ ३२ ते ३५ आया आहेत. 
 
या नर्स अाया दररोज तीन शिफ्टमध्ये काम करून ७० ते ८० माता त्यांच्या बाळांंची काळजी घेतात. प्रसुती, सिझर, बाळाजी काळजी, देखरेख, औषधांची माहिती, बाळाच्या जन्माचे रेकॉर्ड असे एक ना अनेक कामे या नर्स आयांना करावी लागतात. एवढ्या धावपळीत एखादी माता तिच्या बाळाकडे दुर्लक्ष झाल्यास त्यांना नातेवाईकांची बोलणीदेखील ऐकावी लागतात. त्यामुळे काम करावे तरी कसे, असा प्रश्न येथील डॉक्टर, नर्स, आया इतर कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासन पदाधिकारी मात्र या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत आहेत. 
 
पाच कोटींचा प्रस्ताव फेटाळला 
रुग्णालयाच्यानुतनीकरणासाठी पाच कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला होता. परंतु हा प्रस्ताव फेटाळला. रुग्णालयासाठी टप्प्याटप्प्याने निधी देण्यात येणार आहे. जोपर्यंत मोठा निधी उपलब्ध होत नाही, तोपर्यंत रुग्णालयाचा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी तांत्रिक सुविधांसह पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी अाहे. 
 
अतिदक्षता विभागाची गरज 
मनपारुग्णालयात अनेकदा निकषांपेक्षा कमी वजनाच्या बाळांचा जन्म होतो. त्यांना इन्क्युबेटर किंवा दक्षता विभागात ठेवण्याची गरज असते. या रुग्णालयात ही व्यवस्थाच नसल्याने बाळांना खासगी रुग्णालयांत ठेवावे लागते. त्यामुळे आई मनपा रुग्णालयात बाळ दुसरीकडेच, या परिस्थितीला अनेकांना तोंड द्यावे लागते. 
 
असे आहेत कर्मचारी 
स्त्रीरोगतज्ज्ञ - ( गरज ४) 
पूर्णवेळ डॉक्टर - (गरज ५) 
अर्धवेळ डॉक्टर - (गरज ७) 
नर्स - १४ (गरज २०) 
आया - ३५ (गरज ६०) 
शिपाई - (गरज ८) 
स्वच्छता कर्मचारी- (गरज ८) 
बातम्या आणखी आहेत...