आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांगरमल दारुकांड: दोषी पाेलिसांवर कारवाई करायला सापडेना मुहूर्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पांगरमल दारुकांडात जणांचे बळी जाऊनही अद्याप एकाही पोलिसावर कारवाई झालेली नाही. हे मृत्यूकांड बनावट दारुमुळेच घडल्याचे निष्पन्न झाले आहे. दारूनिर्मिती करणाऱ्या आरोपींशी काही पोलिसांचे चांगलेच सख्य होते, ही बाबही सर्वश्रूत आहे. संबंधितांची चौकशीही करण्यात आली. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनीही याबाबत झाडाझडती घेतली. मात्र, अद्याप दोषी पोलिसांवर कारवाईला मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे आरोपींशी सख्य ठेवणाऱ्या पोलिसांना अभय दिले की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 
 
राजकीय उमेदवारांनी दिलेल्या पार्टीमध्ये दारु घेतल्यामुळे पांगरमलला जणांचे बळी गेले. पारनेर नगर तालुक्यातील सहा जणांचे अति मद्यसेवनामुळे बळी गेले. बनावट मद्यनिर्मितीच्या रॅकेटचे धागेदोरे परजिल्ह्यांतही गवसले आहेत. पोलिसांनी धुळ्यातील कुख्यात मद्यतस्कर दादा वाणीला अटक केली आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पालकमंत्री राम शिंदे यांनी पांगरमलला भेट देऊन आरोपींवर मोक्कानुसार, तर अवैध दारुविक्रीला जबाबदार असलेल्या पोलिसांवरही कारवाईची मागणी केली. 
 
तीन दिवसांपूर्वी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे नगरमध्ये अाले होते. पोलिस अधीक्षक कार्यालयात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, अतिरिक्त अधीक्षक घनश्याम पाटील, सहायक अधीक्षक चिन्मय पंडित यांच्यासह तपासी अधिकारी आनंद भोईटे यांच्याकडून पांगरमल प्रकरणाचा आढावा घेतला. बनावट मद्यनिर्मिती रॅकेटमधील आरोपींशी काही पोलिसांचे संपर्क असल्याचे त्यांच्याही लक्षात अाले. 
 
बनावट दारुनिर्मितीच्या रॅकेटमधील आरोपींशी काही पोलिसांबरोबर अर्थपूर्ण संबंध आहेत, ही बाब सर्वश्रूत आहे. अतिरिक्त अधीक्षक घनश्याम पाटील यांनीही याबाबत चौकशी केली. दारुकांडातील आरोपींचे संपर्क त्यांनी तपासले आहेत. गेल्या सहा महिन्यांत आरोपींचे काही पोलिसांशी दीड-दोन हजार कॉल्स झाल्याचे समोर आले आहे. काही संशयितांचीही कसून चौकशी झाली आहे. याचा आढावाही विशेष पोलिस महानिरीक्षकांपुढे सादर झाला आहे. मात्र, अजूनही दोषी पोलिसांवर काहीच कारवाई झाल्यामुळे संशयाचे धुके निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. 
 
खडतर तपासाचे पोलिसांपुढे आव्हान 
पांगरमल दारुकांडातील जवळपास बहुतांश आरोपींना अटक होऊन पोलिस कोठडीही मिळाली आहे. शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्री मोकाटे, गोविंद मोकाटे याकूब शेख हे तीनच आरोपी आता फरार आहेत. मात्र, अजूनही अनेक मुद्यांचा उलगडा पोलिसांना झालेला नाही. त्यामुळे या गुन्ह्याच्या खडतर तपासाचे आव्हान अद्यापही पोलिसांसमोर कायम आहे. शिवाय काही सामाजिक संघटनांनी पोलिस तपासावर संशय व्यक्त करत सीआयडीकडे तपास सोपवण्याची मागणीही केली आहे. 
 
पांगरमलमधून पोलिसांनी पहिल्या दिवशीच दारुचे काही बॉक्स जप्त केले. पण तेव्हा ताब्यात घेतलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी जास्त दारुचे बॉक्स होते. पोलिसांनी जप्त केलेल्या बॉक्सची संख्या कमी होती. त्यामुळे आरोपींकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. गेल्या वेळी याच मुद्याच्या आधारे आव्हाड दाम्पत्याच्या कोठडीत वाढ झाली होती. मात्र, तरीही घटनास्थळाहून गायब झालेल्या उर्वरित दारुच्या बॉक्सविषयी
पोलिसांना काहीच माहिती मिळू शकली नाही. 
 
अल्कोहोल कोठे वितरित होत असे? 
दादा वाणी, पंचायत समिती सदस्य मंगल आव्हाड, त्यांचे पती महादेव आव्हाड, भरत जोशी यांची पोलिस कोठडी संपल्यामुळे त्यांना गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने वाणी, आव्हाड दाम्पत्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली, तर भरत जोशीच्या पोलिस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली. जोशी धुळ्याहून वाणीकडून अल्कोहोल आणायचा. ते त्याने कोठे कोठे वितरित केले, याच्या चौकशीकरिता पोलिसांनी त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. 
 
कुटुंबीयांना अद्याप मदत जाहीर नाहीच 
पांगरमल दारुकांडात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी ग्रामस्थांची मागणी होती. आचारसंहितेचे कारण पुढे करत प्रशासन त्यावर बोलायला तयार नव्हते. पालकमंत्री राम शिंदे यांनी गावात भेट दिली, त्यावेळी आचारसंहिता संपताच आर्थिक मदतीची घोषणा केला जाईल, असे सूतोवाच केले होते. आचारसंहिता संपली, निवडणुकांचे निकालही लागले. तरीही अद्याप शासनाकडून पांगरमल दारुकांडात बळी गेलेल्या लोकांच्या वारसांना कोणतीही शासकीय मदत जाहीर झालेली नाही.
 
पुढच्या स्लाईडवर वाचा ,फौजदारासह तिघांवर निलंबनाची कुऱ्हाड... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...