आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपींच्या वकिलांना म्हणणे मांडण्यासाठी मुदत, पांगरमल दारुकांड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नगर- नगर तालुक्यातील पांगरमल दारुकांडातील पाच आरोपींना पुन्हा पाेलिस काेठडीत घेण्यापूर्वी त्यांच्या वकिलांना म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाने मुदत दिली. त्यामुळे आणखी दोन दिवस हे आरोपी न्यायालयीन कोठडीत राहणार आहेत. मार्चला त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल. त्यावेळी आरोपींचे वकील आपले म्हणणे मांडतील. त्यानंतर पाच आरोपींना पोलिस कोठडी दिली जाणार आहे. सोमवारी दुपारी या आरोपींना सबजेलमधून न्यायालयात हजर करण्यात आले होते. 
 
पांगरमल येथील दारूकांड प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यात १६ आरोपी आहेत. त्यापैकी शिवसेनेचा उपजिल्हाप्रमुख भीमराज गेणू आव्हाड, रावसाहेब गेणू आव्हाड (दोघेही राहणार पांगरमल, ता. नगर), जगजितसिंग किशनसिंग गंभीर, जाकीर कादीर शेख हमीद अली शेख (तिघेही राहणार नगर) या आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली होती. मात्र, गुन्ह्याच्या अधिक तपासाकरिता त्यांच्या पोलिस कोठडीची आवश्यकता अाहे. त्यामुळे न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश रद्द करुन या आरोपींना पुन्हा पोलिस कोठडी द्यावी, असा अर्ज पोलिसांनी सत्र न्यायालयात केला होता. 
 
पोलिसांचा अर्ज सत्र न्यायालयाने मंजूर करत या आरोपींना पुन्हा पोलिस कोठडी देण्याची परवानगी दिली. त्यानुसार सोमवारी दुपारी साडेचार वाजता आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आदिती नागोरी यांच्यासमोर हजर करण्यात आले. 
 
फौजदार नागवे यांनी आरोपींना पोलिस कोठडी देण्यासाठी युक्तिवाद केला. यामध्ये काही नव्या मुद्यांचाही समावेश होता. त्यानंतर आरोपींच्या वकिलांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली. त्यांना दोन दिवसांची मुदत मिळाली. आता मार्चला या आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल. दरम्यान, यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचा सामाजिक संघटनांचा दबाव वाढत आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...