आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रीभ्रूण हत्या हा समाजाला लागलेला कलंक : हेमलताजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदनवन लॉन येथे आयोजित भागवत कथा साेहळ्यात दहिहंडी फोडताना बाल श्रीकृष्ण. - Divya Marathi
नंदनवन लॉन येथे आयोजित भागवत कथा साेहळ्यात दहिहंडी फोडताना बाल श्रीकृष्ण.
नगर - भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या श्रीकृष्णाकडून आपला मृत्यू निश्चित अाहे, या भितीपोटी कंसाने देवकीच्या पोटी जन्माला आलेल्या बाळांची जन्मत:च हत्या केली. आजच्या युगातही असे कंस समाजात आहेत, मागील दहा वर्षांत देशभरात आठ लाख स्त्रीभ्रूण हत्या झाल्याचे एका अहवालात आले आहे. हे प्रकार थांबण्यासाठी समाजातील प्रत्येकाने मानसिकता बदलायला हवी, असे आवाहन वृंदावन मथुरा येथील राष्ट्रीय संत हेमलताजी शास्त्री यांनी केले. 
 
जाधव परिवार नंदनवन उद्योग समूहातर्फे नंदनवन लॉन्स येथे आयोजित भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात त्या बोलत होत्या. हेमलताजी यांनी श्रीकृष्ण जन्मानंतरच्या बाललिलांचे निरुपण करताना प्रखर विचार मांडत समाजातील चुकीच्या गोष्टींवर परखड भाष्य केले. यावेळी बाल श्रीकृष्णाच्या रुपातील मुलाच्या हस्ते दहीहंडी फोडून श्रीकृष्ण बाललीलांचा आनंद घेण्यात आला. यावेळी बाबासाहेब जाधव, सुरेश जाधव, संजय जाधव, दत्ता जाधव, नंदलाल मणियार, मगन पटेल, स्थायी समिती सभापती सुवर्णा जाधव, पंडित विजयशंकर मिश्रा आदी उपस्थित होते. 
 
हेमलताजी म्हणाल्या, सरकारने अनेक कायदे केले आहेत, मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे, तरीही स्त्रीभ्रूण हत्यांचे प्रकार होतच आहेत. सरकारने कितीही कडक कायदे केले, तरी मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेपर्यंत काही होणार नाही. महाराष्ट्रातही स्त्री जन्माचे प्रमाण तुलनेने खूप कमी आहे. असेच चालू राहिले, तर तुमच्या घरात सून म्हणून कोण येईल, याचा विचार करायला हवा. स्त्री नसलेल्या घराची कल्पनाही आपण कोणी करू शकत नाही. दोन कुळांचा उध्दार करणाऱ्या मुलीला असे गर्भातच खुडून टाकणे कोणता धर्म आहे, मुलगी नको असा विचार जुन्या काळी झाला असता, तर राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई या महान स्त्रियांचा जन्मच झाला नसता. जिजाऊ नसत्या, तर छत्रपती शिवाजी महाराज, तरी कसे झाले असते, या सर्व गोष्टींचा सर्वांनी बारकाईने विचार करण्याची गरज आहे. आज सर्वच क्षेत्रांत स्त्रियांनी आपल्या कर्तबगारीने स्वत:ला सिध्द करून दाखवले आहे. मुलगा हा वंशाचा दिवा असतो, ही संकल्पना सोडून द्यायला हवी. मुलीही केवळ वडिलांच्याच नव्हे, तर सासरी गेल्यावर त्या घराण्याचाही नावलौकिक वाढवतात. बेटी बचाओ, बेटी पढाओ सारखे उपक्रम सरकारने हाती घेतले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...