आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनावर नियंत्रण नसल्याने वाईट गोष्टींचे आकर्षण, राष्ट्रीय संत हेमलता शास्त्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मनावर नियंत्रण नसल्याने मनुष्य वाईट गोष्टींकडे लवकर आकर्षित होतो. कालांतराने हे आकर्षण व्यसनांत परावर्तित होते. अशा वाईट सवयी सोडून भक्तीमार्गाला लागणे अतिशय कठीण असते. त्यासाठी स्वत:च्या मनाला मित्र बनवून त्याला साधना मार्गाकडे वळवावे. प्रयत्नांमध्ये सातत्य सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास भक्तीचा आनंद मिळतो. एखाद्या रोपट्याप्रमाणे मनाची मशागत करावी. कालांतराने फळ निश्चित मिळेल, असा संदेश राष्ट्रीय संत हेमलता शास्त्री यांनी दिला. 
 
नंदनवन लॉन्स येथे जाधव परिवार नंदनवन उद्योग समूह आयोजित श्रीमद् भागवतकथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात त्या बोलत होत्या. भागवत कथेतील परिक्षित राजा शुकदेव यांची कथा सादर करताना विविध दाखले देत त्यांनी प्रबोधन केले. हेमलता शास्त्री म्हणाल्या, प्रत्येकाला ध्यानधारणा करून भगवंताशी एकरुप होण्याची इच्छा असते. मात्र, ध्यान करण्यास बसल्यावर एकाग्रता होत नाही. मन इतरत्र भटकते. सर्वत्र भ्रमण करणाऱ्या मनाला एका ठिकाणी बांधून ठेवणे शक्य नसते. 
 
मनाला एकाग्र करण्यासाठी एखाद्या मुंगीप्रमाणे सातत्य चिकाटीची गरज असते. मुंगीला गुरू मानून तिच्याकडून चिकाटीची शिकवण घेतली पाहिजे. निसर्ग हा मनुष्याचा सर्वात मोठा गुरू आहे. निसर्गातील प्रत्येक गोष्ट मनुष्याला कोणतीही अपेक्षा ठेवता काही ना काही देत असते. निसर्गाची ही पराेपकारी वृत्ती आपणही अंगीकारली पाहिजे. जेव्हा मन स्थिर असते तेव्हाच ही वृत्ती तयार होते. त्यासाठी मनाला शत्रू मानता आपला मित्र बनवावे. त्यातून मिळणारा आनंद इतर कोणत्याही आनंदापेक्षा मोठा असेल. 
 
महाभारता वेळी भगवान श्रीकृष्णांनी दुर्योधन अर्जुनाला ज्ञान दिले. मात्र, दुर्योधनाची श्रध्दा नसल्याने त्याला श्रीकृष्ण वचनांचा अर्थ कळला नाही. अर्जुनाची मात्र श्रीकृष्णावर पूर्ण श्रध्दा होती. यातूनच कुरूक्षेत्रावर श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेल्या उपदेशातून जगाला ज्ञान देणारी भगवदगीता निर्माण झाली, असे हेमलता शास्त्री यांनी सांगितले. 
 
यावेळी बाबासाहेब जाधव, सुरेश जाधव, संजय जाधव, दत्ता जाधव, नंदलाल मणियार, मगन पटेल, स्थायी समिती सभापती सुवर्णा जाधव, पंडित विजयशंकर मिश्रा यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...