आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहरू मार्केटच्या खासगीकरणाचा ठराव नगरविकास विभागाने केला रद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - चितळे रस्त्यावरील नेहरू मार्केटच्या जागेवर खासगीकरणातून व्यापारी संकुल भाजी मार्केट उभारण्याचा महापालिका स्थायी समितीचा ठराव राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने बुधवारी रद्द केला. याप्रकरणी ३० दिवसांत म्हणणे सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाने महापालिका प्रशासनाला दिले आहेत. 
 
नेहरू मार्केटची ११ गुंठे जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव प्रशासनाने आखला आहे, असा आरोप भाजपचे गटनेते दत्ता कावरे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केला आहे. या प्रकरणी कावरे भाजीविक्रेते संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे यांनी याचिका दाखल केली आहे. नेहरू मार्केटची जागा खासगीकरणाच्या माध्यमातून विकसित करता महापालिकेने स्वत: विकसित करावी, अशी मागणी कावरे, बोराटे, झिंजे यांच्यासह शाकीर शेख, प्रमोद मोहळे यांनी मनपाकडे केली हाेती. हा विषय महासभेत घ्यावा, अशी मागणी बोराटे यांनी केली आहे.
 
दरम्यान, सभागृह नेते अनिल शिंदे, कावरे, विजय बोरूडे शाकीर शेख यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह नगरसचिव विभागाकडे नेहरू मार्केट जागेच्या ठरावाबाबत तक्रार केली. नगरसचिव विभागाने नेहरू मार्केटची जागा विकसित करण्याबाबत स्थायीने केलेला ठराव रद्द करण्यात येत असल्याचे आदेश बुधवारी मनपाला दिले. आदेशाबाबत काही म्हणणे असेल, तर ते ३० दिवसांत सादर करावे, असेही सांगितले. नेहरू मार्केटच्या जागेचे बाजारमूल्य नऊ कोटी २६ लाख रुपये असताना स्थायी समितीने मात्र ही जागा खासगीकरणाच्या माध्यमातून विकसित करण्यासाठी प्रीमियम केवळ दोन कोटी २८ लाख रुपये निश्चित केला आहे. त्यामुळे मनपाचे सात कोटींचे नुकसान होणार असल्याची बाब नगरसचिवांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. मनपा अधिनियम ७९ (ड) नुसार जागेचे बाजारमूल्य विचारात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ठराव महापालिका अधिनियम ४५१ (१) नुसार रद्द करण्यात आला.
 
अखेर यश मिळाले... 
भाजप चेगटनेते दत्ता कावरे, भाजीविक्रेते संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, शाकीर शेख यांनी नेहरू मार्केटची जागा खासगीकरणातून विकसित करण्यास विरोध केला होता. त्यासाठी त्यांनी महापालिकेच्या विरोधात अनेकदा आंदाेलनेही केली होती. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली, तरी त्यांनी नगरविकास विभागाकडे दाद मागितली. अखेर त्यांच्या लढ्यास बुधवारी यश आले. महापालिकेच्या स्थायी समितीने निश्चित केलेला दोन कोटी २८ लाख रुपयांचा प्रीमियमचा ठराव नगरविकास विभागाने रद्द केल्याने नेहरू मार्केटचा विषय आता पुन्हा महासभेत घ्यावा लागणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...