आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मतदारसंख्येत ३७ हजार १२१ नवमतदारांची भर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्याच्या मतदारसंख्येत तब्बल ३७ हजार १२१ नवमतदारांची भर पडली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, जिल्ह्यात अलीकडेच छायाचित्र मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्यात आला. त्याद्वारे ही संख्या समोर आली आहे.
विधानसभेच्या गेल्या निवडणुकीच्या वेळी जिल्ह्याची मतदारसंख्या १४ लाख २६ हजार २५८ होती. नवमतदारांची भर पडल्यामुळे ती आता १४ लाख ६३ हजार ३७९ एवढी झाली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १६ सप्टेंबर ते १९ नोव्हेंबर या काळात राज्यभर विशेष पुनरिक्षण अभियान राबवण्यात आले. या अभियानादरम्यान ही नोंद केली.

एक जानेवारी २०१७ रोजी वयाची अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांना या यादीत स्थान देण्याचे आयोगाचे निर्देश होते. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी आवाहन करुन जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली होती. या यंत्रणेद्वारे १८ सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन रविवारी प्रत्येक मतदान केंद्रावर नवमतदारांकडून नमूना सहा भरुन घेण्यात आला. याशिवाय स्वत: तहसील कार्यालयात पोहचून अर्ज भरुन देण्याची सोय १९ ऑक्टोबरपर्यंत निरंतर सुरुच होती.

नवमतदारांकडून अर्ज भरुन घेत असतानाच वेगवेगळ्या कारणांनी स्थलांतर झालेल्यांची नोंदही या काळात केली गेली. त्यांना नमूना सात भरुन द्यायचा होता. हा अर्ज ११९७ मतदारांनी भरला असून ४२३ मतदारांनी पत्यातील बदलाची नोंद करुन घेत (नमूना आठ अ) मतदारसंघ बदलून घेतला आहे. याशिवाय नाव आणि वयाच्या उल्लेखात चूक दिसून आलेल्या हजार ६७५ जुन्या मतदारांनी नमूना आठ भरुन देत स्वत:बद्दलच्या नोंदी अपटूडेट करुन घेण्याची विनंती केली आहे.

अकोलापश्चिमची हनुमान उडी : पुनरिक्षणमोहिमेत सर्वाधिक ३१ हजार ७२८ मतदार अकोल्यात नोंदले गेले. यापैकी अकोला पश्चिम या विधानसभा मतदारसंघात २० हजार ५७९ मतदार वाढले असून ११ हजार १४९ नवमतदार अकोला पूर्वमध्ये वाढले आहेत. सर्वात कमी ९७२ नवमतदारांची नोंद अकोटमध्ये केली गेली. मूर्तिजापुरात १९८४ तर बाळापुरात २४३७ मतदारांनी नोंद केली आहे.

मतदारसंघ जुने मतदार नवे मतदार एकूण
अकोट २,७०,७१३ ९७२ २,७१,६८५
बाळापूर २,७२,३९० २,४३७ २,७४,८२७
अकोला प. २,८१,६८७ २०,५७९ ३,०२,२६६
अकोला पू. ३,०६,५८४ ११,१४९ ३,१७,७३३
मूर्तिजापूर २,९४,८८४ १९८४ २,९६,८६८
बातम्या आणखी आहेत...