आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निघोजमधील ग्रामसभेत गोंधळ, पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निघोज- महात्मा गांधी जयंतीनिमित्त घेण्यात आलेली ग्रामसभा कोणताही निर्णय होता गोंधळात उरकावी लागली. सत्ताधारी विरोधकांत शाब्दिक चकमक झाली. प्रकरण मारामारीवर आले. एकमेकांच्या गचांड्या धरण्यात आल्या. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर थोडी शांतता निर्माण झाली. 

सरपंच ठकारामशेठ लंके सभेच्या अध्यक्षस्थानी होते. ग्रामपंचायत सदस्य सचिन वराळ, मंगेश लाळगे, भिमाशेठ लामखडे, दत्तात्रेय गुंड, मंगेश वराळ, ज्येष्ठ नेते रंगनाथ वराळ, मळगंगा पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष बजरंग वराळ, सुनील पवार, माउलीशेठ वरखडे, राष्ट्रवादीचे विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष निवृत्ती वरखडे, अर्जुन लामखडे, अशोक वरखडे, अविनाश वराळ, राहुल वराळ, सुमन कवाद, सविता गायखे यांनी मागील ग्रामसभेतील ठरावाची अंमलबजावणी केली का, असा प्रश्न ग्रामसेवक दातीर यांना विचारला. ते निरूत्तर झाले. पूर्ण माहिती द्या, अन्यथा ग्रामसभा आठ दिवसांनी घ्या, अशी सूचना विरोधकांनी केली. मात्र, आजची ग्रामसभा योग्य असल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांनी सभा सुरू ठेवली. विरोधी सदस्य त्यांच्या कार्यकर्त्यांनी मागील सभेच्या ठरावाची अंमलबजावणी करण्याची जोरदार मागणी केल्याने सभेत गोंधळ झाला. कोण काय बोलतो हे समजेनासे झाले. बाळासाहेब लामखडे, उमेश सोनवणे सरपंच लंके यांनी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना अपयश आले. सभेत अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला. 

माजी सरपंच संदीप वराळ यांच्या हत्येनंतर २६ जानेवारीला जी ग्रामसभा घेण्यात आली, त्यात मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यात आली नाही, याचा वराळ समर्थकांनी निषेध केला. मात्र, या ठरावाची अंमलबजावणी झाल्याची माहिती सरपंच लंके यांनी दिली. मात्र, परिपूर्ण माहितीसाठी ग्रामसभा आठ दिवसांनी घेण्याची मागणी वराळ समर्थकांनी केली. सत्ताधारी विरोधकांत शाब्दिक चकमक झाली. प्रकरण मारामारीवर आले. एकमेकांच्या गचांड्या धरण्यात आल्या. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर थोडी शांतता निर्माण झाली. मात्र, परिपूर्ण माहिती मिळाल्यानंतरच सभा घ्या, हा मुद्दा विरोधकांनी लावून धरल्यामुळे पुन्हा गोंधळ झाला. अखेर सरपंच लंके यांना ग्रामसभा आठ दिवसांनी घेण्याचे जाहीर करावे लागले. मोठा पोलिस बंदोबस्त असल्याने सभेत गोंधळ होणार अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. 

अतिक्रमणधारकांचे शक्तिप्रदर्शन 
ग्रामसभेत अतिक्रमणधारकांनी शक्तिप्रदर्शन केले. ज्यांची घरे पाडण्यात आली, त्यांनी ग्रामपंचायत कारभारावर जोरदार टीका केली. मात्र, संयमाने उत्तर देण्याचा प्रयत्न करत सरपंच लंके यांनी ग्रामपंचायतची बाजू बरोबर असल्याचे स्पष्ट केले. विरोधक गोंधळ करत सभेला गालबोट लावून सामाजिक शांतता बिघडवण्याचे काम करत अाहेत. आम्ही केलेला विकास त्यांना बघवत नाही, असे ते म्हणाले. 

महिलांना ग्रामसभेची माहितीच दिली नाही 
सकाळी साडेआठ वाजता घेण्यात आलेल्या महिलांच्या ग्रामसभेची माहिती महिलांनाच देण्यात आली नव्हती. या सभेला पंचवीस महिलाच उपस्थित होत्या. चुकीचे ठराव करण्यात आल्याने ही ग्रामसभा रद्द करण्याची मागणी बचत गटाच्या अध्यक्ष सविता गायखे यांनी केली. आठ दिवसांनी होणाऱ्या ग्रामसभेला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गायखे यांनी केले. 
 

आरोपींना पाठबळ देऊ नका... 
संदीपवराळ हत्येतील आरोपींना पाठबळ देण्याचे काम सत्ताधारी करत असून हे यापुढे खपवून घेतले जाणार नाही. आंदोलनाच्या माध्यमातून संदीप पाटील युवा मंचाचे कार्यकर्तेे जनतेचे लक्ष वेधून समाजप्रबोधन करून आरोपींना पाठबळ देणाऱ्यांचा निषेध करतील, असे सामाजिक कार्यकर्ते सुनील पवार, संदीप पाटील यूथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन वराळ यांनी देताच उपस्थितांने टाळ्या वाजवून संमती दिली. 
बातम्या आणखी आहेत...