आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘निळवंडे’साठी परतीच्या बोलीवर सरकारला पाचशे कोटी देणार; साईबाबा संस्थानची तत्त्वत: मान्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- उत्तरनगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामासाठी सरकारला परतीच्या बोलीवर पाचशे कोटी रुपये देण्याच्या निर्णयास साईबाबा संस्थान व्यवस्थापन मंडळाने तत्त्वत: मान्यता दिली आहे.
 
याप्रश्नी राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या प्रयत्नाला यश मिळाले आहे. व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीस संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त बिपीन कोल्हे, सचिन तांबे, भाऊसाहेब वाकचौरे, मोहन जयकर, योगिता शेळके,कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, उपकार्यकरी अधिकारी संदीप आहेर आदी उपस्थित होते. निधी अभावी गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या निळवंडे धरण कालवे यांचे काम रेंगाळले आहे. 

दोन वर्षांपूर्वी धरणाचे काम पूर्ण होऊन धरणात पाणी अडवले. मात्र कालव्यांची कामे अर्धवट असल्याने उत्तर नगर जिल्ह्यातील जिराईत भागातील शेती पाण्यावाचून वंचित राहिली आहे. निळवंडेच्या कालव्यासाठी साईबाबा संस्थानने परतीच्या बोलीवर पाचशे कोटी रुपये द्यावेत यासाठी विरोधी पक्ष नेते विखे यांनी संस्थान सरकारकडे पाठपुरावा केला. गेल्या पंधरवडायात साई समाधी शताब्दी सोहळा समितीच्या बैठकीत विखे यांनी या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून निळवंडे कालव्याच्या कामासाठी संस्थान कडून परतीच्या बोलीवर पाचशे कोटी रुपये देण्याची मागणी केली होती. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखे यांच्या या मागणीला तत्त्वत: मान्यता देत वरिष्ठ अधिकारण्यांना सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी साई संस्थांच्या व्यवस्थापन मंडळाच्या झालेल्या बैठकीत निळवंडेच्या कालवे कामासाठी पाचशे कोटी रुपये परतीच्या बोलीवर देण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थानच्या या निर्णयामुळे राहाता,कोपरगाव, राहुरी,संगमनेर, अकोले याभागतील शेतकऱ्यां मध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

प्रशासनविश्वस्त यांच्या झालेल्या वादाची चर्चा 
साईसंथान विस्वस्थ मंडळाची बैठक ११ वाजता सुरू होणार होती. सभागृहात कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल नगराध्यक्षा योगिता शेळके ११ ते वाजे पर्यंत सभागृहात बसून होत्या. वाजे पर्यंत विस्वस्थ सभागृहात येत नाही हे लक्षात येताच कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल विस्वस्थ योगिता शेळके सभागृह सोडून निघून गेले. त्यानंतर लागलीच विश्वस्त मंडळ सभागृहात गेले त्यानंतर थोड्याच वेळात कार्यकारी अधिकारी अग्रवाल शेळके सभागृहात गेले याबाबत शिर्डीत उलट सुलट चर्चेला उधाण आले. 

बंद खोलीत झालेल्या बैठकीत येण्यास मज्जाव...
व्यवस्थापनमंडळाच्या बैठक सुरू होताच आपणास टाळून संस्थांनचे अध्यक्ष अन्य विश्वास्थानी ११ वाजता बैठक सुरू होणार होती पण वाजेपर्यंत आपण कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल दोन तास सभागृहात बसून होतो. अन्य विश्वस्त मात्र सभागृहाबाहेर चर्चा करत होते. आपण शिर्डीच्या प्रतिनिधी पदसिद्ध विश्वस्त असतानाही अध्यक्ष अन्य विश्वस्तांनी बंद खोलीत झालेल्या बैठकीत येण्यास मज्जाव केला.
- योगिता शेळके, नगराध्यक्षा, शिर्डी. 
बातम्या आणखी आहेत...