आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीरामपूर: गळनिंब येथील वृद्धाने पेटवून घेतले, अतिक्रमण काढण्यासाठी आल्याचा निषेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
श्रीरामपूर- तहसीलदारांच्या आदेशानुसार मंदिराच्या जागेतील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचारी पदाधिकाऱ्यांसमोर अनिल अंबादास कुलकर्णी या वृध्दाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. ही घटना तालुक्यातील गळनिंब येथे गुरुवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास घडली. त्यांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात कुलकर्णी दाम्पत्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
गळनिंब येथील हनुमान मंदिराजवळ ग्रामपंचायत जागेत पत्र्याच्या खोल्या बांधून कुलकर्णी राहतात. हे अतिक्रमण काढण्याची मागणी गावकऱ्यांनी ग्रामपंचायतींनी केली होती. तहसीलदार सुभाष दळवी यांनी कुलकर्णी यांना अतिक्रमण काढण्याची नोटीस दिली. त्यांच्याशी चर्चा केली, पण त्यांनी अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा तहसीलदार दळवी यांची भेट घेतली. त्यांनी अतिक्रमण काढण्याचा आदेश दिला. 
 
लोणी पोलिस ठाण्याचे अधिकारी महसूल खात्याचे कर्मचारी गुरुवारी गळनिंब येथे गेले. त्यांनी अतिक्रमण काढण्याची तयारी सुरु करताच कुलकर्णी यांनी घराचे दार बंद करुन अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. हा प्रकार बघून अतिक्रमण काढणारे अधिकारी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, काही प्रमुख मंडळींनी काढता पाय घेतला. जखमी झालेल्या कुलकर्णी यांना लोणी येथील रुग्णालयात हलवले. ते ८० टक्के भाजले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...