आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइनचा महसूलला तीस कोटींचा फटका? 92 कोटींच्या वसुलीसाठी गौण खनिजला करावी लागणार कसरत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - ऑनलाइन वाळू लिलावांना प्रतिसाद मिळत नसल्याने यंदा महसूल विभागाला ठरवून दिलेल्या ९२ कोटींच्या महसूल वसुलीसाठी तारेवरची कसरत करावी लागणार अाहे. आतापर्यंत केवळ सात कोटींचा महसूल वसूल झाला अाहे. वाळूचे लिलाव होत नसल्याने यंदा सुमारे ३० कोटींच्या वसुलीला फटका बसणार आहे. 
 
यंदाच्या वर्षी राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला ९२ कोटींच्या महसूल वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. गेल्या वर्षी या विभागाला तब्बल ११५ कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यात सर्वाधिक शंभर कोटींचा महसूल हा गौण खनिज विभागाकडून दिला गेला होता. वाळूचे लिलाव गौण खनिज विभागामार्फत घेतले जातात. गेल्या वर्षी ६४ वाळूसाठ्यांचे ऑनलाइन लिलाव घेण्यात येणार होते. त्यातून तब्बल ७७ कोटी ९० लाख ४८ हजार ८१४ रुपयांचा महसूल मिळणार होता. 
 
गेल्या वर्षी १३ वेळा घेण्यात आलेल्या ऑनलाइन वाळू लिलावात ६४ साठ्यांपैकी केवळ १७ साठ्यांचे लिलाव झाले. उर्वरित ४७ वाळू साठ्यांचे लिलावच झाले नाहीत. त्यामुळे ३५ कोटींपेक्षा जास्त महसूल बुडाला. यंदाही तशीच परिस्थिती आहे. 
 
यंदा नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, संगमनेर, पारनेर, राहुरी, राहाता, श्रीगोंदे या तालुक्यांतील प्रवरा, मुळा, घोड, भीमा, गोदावरी या नदीपात्रांतील एकूण ६९ वाळूसाठ्यांचे आॅनलाइन लिलाव होणार आहेत.
 
पहिला लिलाव २२ नोव्हेंबरला झाला. त्यात श्रीरामपूर तालुक्यातील १, संगमनेर तालुक्यातील १, राहुरी तालुक्यातील श्रीगोंदे तालुक्यातील तीन अशा सहा वाळूसाठ्यांचेच ऑनलाइन लिलाव झाले. त्यातून कोटी ६३ लाखांचा महसूल प्रशासनाला प्राप्त झाला. त्यानंतर डिसेंबरला पुन्हा वाळूसाठ्यांचे लिलाव घेण्यात आले. मात्र, एकाही वाळूसाठ्याचा लिलाव झाला नाही. २० डिसेंबरला तिसऱ्यांदा लिलाव घेण्यात आले. मात्र, केवळ एकच साठ्याचा लिलाव झाला. 
डिसेंबरमध्ये नोटबंदीमुळे वाळू व्यावसायिकांनी लिलावाकडे पाठ फिरवली.
 
जानेवारीत दोन वेळा लिलाव झाले. त्यावेळी केवळ तीन साठ्यांचे लिलाव होऊ शकले. लिलावांना कमी प्रतिसाद मिळत असल्यामुळे प्रशासनाने वाळू निविदांचे दर २५ टक्क्यांनी कमी केले होते. शेवटचा लिलाव २२ फेब्रुवारीला झाला. त्यावेळी दोनच साठ्यांचे लिलाव झाले. त्यातून कोटी लाखांचा महसूल मिळाला. 
 
गेल्या चार महिन्यांत सहा वेळा घेण्यात आलेल्या ऑनलाइन लिलावांत ६९ साठ्यांपैकी केवळ १२ साठ्यांचे लिलाव झाले. या लिलावांतून कोटी ८४ लाखांचा महसूल प्रशासनाला प्राप्त झाला. ठरवून दिलेल्या उद्दिष्टापैकी केवळ दहा टक्के महसूलदेखील अजून वसूल झालेला नाही. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत ९२ कोटींचा महसूल कसा वसूल करायचा, या चिंतेत सध्या गौण खनिज विभाग आहे. यंदाही ऑनलाइन लिलावांचा महसूल वसुलीला आर्थिक फटका बसणार असून, सुमारे ३० कोटींच्या महसुलावर प्रशासनाला पाणी सोडावे लागणार आहे. 
 
आतापर्यंत अवघा कोटींचा महसूल जमा 
- गेल्यावर्षी ७७ कोटी ९० लाख ९१ हजारांचा महसूल लिलाव, तसेच वाळूचोरीपोटी आकारण्यात आलेल्या दंडातून वसूल करण्यात आला होता. आतापर्यंत कोटींचा महसूल वसूल झाला आहे. वसुलीची कार्यवाही सुरू आहे. मार्चअखेरपर्यंत ही वसुली होईल. '' संजय ब्राह्मणे, गौणखनिकर्म अधिकारी. 
बातम्या आणखी आहेत...