आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरवलेल्या बालकांसाठी महिनाभर ऑपरेशन स्माईल...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनैतिक मानवी वाहतूक कक्षातर्फे हरवलेल्या सापडलेल्या बालकांसंदर्भात त्यांच्या पुनर्वसनाबाबत आयोजित प्रशिणात सहभागी पोलिस कर्मचारी.
नगर- हरवलेल्या-सापडलेल्या बालकांसंदर्भात त्यांच्या पुनर्वसनाबाबत संकेतस्थळावर माहिती अपडेट करण्याबाबत जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. पोलिस मुख्यालयात आयोजित केलेल्या या कार्यशाळेला जिल्ह्यातील ३० पोलिस ठाण्यांतील २१ अधिकारी ४१ कर्मचारी उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनेनुसार हरवलेल्या बालकांच्या संदर्भात ऑपरेशन स्माईल दोन ही शोधमोहीम 1 ते 31 जानेवारी या कालावधीत राबवली जात आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या अंतर्गत असलेल्या अनैतिक मानवी वाहतूक कक्षातर्फे पोलिस मुख्यालयात ही बैठक घेण्यात केली. यात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बाळा हेडे यांनी www.trackthemissingchild.gov.in या संकेतस्थळावर हरवलेल्या सापडलेल्या बालकांची माहिती अद्ययावत करण्याचे प्रशिक्षण दिले. जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत जिल्हा स्तरावर बालकांबाबत काम करणाऱ्या शासकीय निमशासकीय यंत्रणांचे माहितीपत्रक देऊन ते पोलिस ठाण्याच्या दर्शनी भागात लावण्याच्या सूचना दिल्या.
बाल न्याय अधिनियम २००० (२००६) अंतर्गत हरवलेल्या सापडलेल्या बालकांबाबत त्यांच्या पुनर्वसनाबाबत बाल कल्याण समितीची संपूर्ण प्रक्रिया डॉ. प्रीतमकुमार बेदरकर यांनी कार्यशाळेत दिली. परिविक्षा अधिकारी अलका निसळ यांनी महिला बालविकास विभागांतर्गत अत्याचारग्रस्त बालकांसाठी असलेल्या मनोधैर्य योजनेची माहिती दिली. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी सहायक निरीक्षक राजकुमार हिंगोले उपनिरीक्षक संदीप शिंदे, अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे बाबासाहेब इखे यांनी पुढाकार घेतला. कार्यशाळेसाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी अर्जुन दळवी, महेंद्र पांढरे, गणेश ताठे हे प्रयत्नशील होते.