आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांगरमल दारूकांडाची सीआयडी चौकशी करा, अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीवर अण्णा हजारे ठाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पांगरमल बनावट विषारी दारूकांड प्रकरणात पोलिस राज्य उत्पादन शुल्क विभाग आपली जबाबदारी टाळत आहे. त्यामुळे पोलिस राज्य उत्पादन शुल्कच्या प्रमुखांवर कठोर कारवाई करावी, या मागणीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ठाम आहेत. राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी झालेल्या चर्चेतही हजारे यांनी पोलिस तपासाबाबत नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. 
 
बनावट विषारी दारू प्यायल्यामुळे पांगरमल गावातील नऊ जणांचा बळी गेला. पाठोपाठ दरेवाडी (ता. नगर) तरवडी (ता. नेवासे) येथेही चौघे जण दगावले. आतापर्यंत जिल्ह्यात बनावट दारुमुळे १३ हून अधिक बळी गेले आहेत. याबाबत हजारे यांच्याकडे तक्रारी गेल्या होत्या. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेलद्वारे पत्र पाठवले. त्यामुळे पोलिस राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांना राळेगणला धाव घ्यावी लागली. 

पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दारूकांडाच्या तपासाचा अहवाल हजारेंना विशद केला. दोषी पोलिस कर्मचाऱ्यांवर केलेल्या कारवाईची माहिती दिली. त्रिपाठी यांनी गेल्या वर्षांत अवैध दारूविक्रीवर केलेल्या कारवाईची आकडेवारी दाखवली. आपले विभाग चांगले काम करत असल्याची ग्वाही दोन्ही अधिकाऱ्यांनी दिली. तथापि, हजारे यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. पोलिस नेमक्या काय कारवाया करतात हे अापल्याला चांगले ठाऊक आहे, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. 
दरम्यान, या भेटीनंतर उत्पादन शुल्कमंत्री बावनकुळे यांनी हजारे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यातही दोन्ही अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कठोर कारवाई करण्याच्या मागणीवर हजारे ठाम होते. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी, असेही ते म्हणाले. 

दारूकांडातील आरोपींशी काही पोलिसांचे लागेबांधे असल्याच्या तक्रारी हजारे यांच्याकडे गेल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या तपासाची माहिती हजारे घेत आहेत. राजकीय नेतेच आरोपी असून त्यांचे पोलिसांचे संबंध लक्षात घेता या प्रकरणाचा तपास सीआयडीने करावा, अशी हजारे यांची मागणी आहे. याबाबत अण्णा हजारे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करणार आहेत. 
 
व्यथा लक्षात घ्या 
दारूचे दुष्परिणाम अनेक आहेत. दारूचा सर्वाधिक त्रास महिलांना होतो. मद्यपी पुरुष महिलांना मारहाण करतात. महिलांच्या तक्रारी आमच्या कार्यालयात येतात. सुदैवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाला महिला अधीक्षक लाभल्या आहेत. किमान त्यांनी तरी महिलांच्या व्यथा आणि अडचणी जाणून घेतल्या पाहिजेत, असे सांगत हजारे यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक जाधव यांना कारवाईचे आवाहन केले. 

तुम्ही तक्रारी तर घ्या... 
अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी आम्ही आहोतच. लोकांनीही दारूबंदीबाबत जनजागृतीसाठी पुढे यायला हवे, अशी अपेक्षा हजारे यांच्यासमवेत झालेल्या चर्चेत पोलिस अधीक्षक त्रिपाठी यांनी व्यक्त केली. त्यावर हजारे म्हणाले, लोकं जनजागृती करायला येतीलही, पण तक्रारींचे काय? लोक पोलिस ठाण्यात जेव्हा तक्रारी द्यायला येतात, त्याची पोलिस दखल घेतात का? आधी तक्रारी तर घ्या, असे हजारे पोलिस अधीक्षकांना म्हणाले. 
 
पाठपुरावा करणार 
- पांगरमल दारूकांडामुळे जिल्ह्याची बदनामी झाली आहे. नागरिकांच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. या प्रकरणाला पोलिस राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारीच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, या मागणीवर मी ठाम आहे. तसेच या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे द्यायला हवा, हीदेखील माझी मागणी आहे. या अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहील.
''अण्णाहजारे, ज्येष्ठ समाजसेवक. 
 
पुढील स्लाईडवर वचा, दारूबंदीसाठी कारवाईचा पोलिसांचा दावा... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...