आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांगरमल दारुकांड: दारूने घेतला आठवा बळी; तीन जण पोलिसांच्या ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - बनावट दारुमुळे पांगरमल येथे सहा, शिंगवे केशव येथे एक कौडगाव येथे एक असे आठ जणांचे बळी गेले अाहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली अाहे. अटकेत असलेल्या आरोपींच्या फोन कॉलचे रेकॉर्ड पोलिसांना प्राप्त झाले असून, कॉल रेकार्डची तपासणी करून आवश्यक वाटल्यास संबंधितांची चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, या बनावट दारुमूुळे नगर तालुक्यातील कौडगाव येथे शनिवारी बाळू नारायण मदने यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी मोहन दुग्गल, त्याचा मुलगा सोनू दुग्गल शेखर जाधव या तीन जणांना नांदेड येथून ताब्यात घेतले. दरम्यान, ‘दिव्य मराठी’ने शनिवारी विरोधी पक्षनेत्यासह पालकमंत्र्यांना विसर असे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे रविवारीू पांगरमलमध्ये येणार आहेत. 
 
नगर तालुक्यातील पांगरमल येथे एका राजकीय नेत्यांच्या मेजवानीत बनावट दारुचे सेवन केल्यामुळे पोपट रंगनाथ आव्हाड, राजेंद्र खंडू आव्हाड, दिलीप रंगनाथ आव्हाड प्रभाकर पेटारे या चार जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बुधवारी हिरोजी नाना वाकडे राजेंद्र भानुदास आव्हाड या आणखी दोन जणांचा मृत्यू झाला होता. गुरुवारी आणखी शहादेव भाऊराव आव्हाड या एक जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी कौडगाव येथे बनावट दारुमुळे बाळू नारायण मदने (४५) यांचा मृत्यू झाला, तर नरेंद्र चलाखे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी प्रारंभी पाेलिसांनी भीमराव आव्हाड याला अटक केली होती. चौकशीत त्याने सिव्हिलच्या कॅन्टीनमधून दारू खरेदी केल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी कॅन्टीनमध्ये छापा टाकून बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले होते. त्यानंतर पोलिसांनी जितू गंभीर त्याचबरोबर कॅन्टीन चालवणारा पत्रकार जाकीर शेख हनिफ शेख या तीन जणांना अटक केली होती. हे तिघे सध्या पोलिस कोठडीत अाहेत. अटकेत असलेल्या आरोपींच्या फोन कॉलची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी मोबाइल कंपन्यांना पत्र पाठवले होते. त्याची सविस्तर माहिती पोलिसांना मिळाली आहे. 

मोहन दुग्गलच दारुचा मुख्य वितरक 
- बनावट दारुप्रकरणी नांदेड येथून मोहन दुग्गल, सोनू दुग्गल शेखर जाधव यांना ताब्यात घेतले आहे. मोहन दुग्गल हाही दारू वितरित करत होता. त्याने जिल्ह्यात कुठे, कधी ही दारू वितरित केली. त्याची माहिती घेतली जाणार आहे. त्यांच्या संपर्कात कोण होते, त्याच्या कॉलचीही तपासणी करण्यात येणार आहे. अन्य तीन आरोपींच्या फोन कॉलचे रेकॉर्ड पोलिसांना मिळाले असून, त्या अनुसंघाने पोलिस तपास करत आहेत.
आनंद भोईटे, तपासी अधिकारी, पोलिस उपअधिक्षक 
 
उद्या रास्ता रोको 
बनावट दारुमुळे पांगरमल येथील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही दहा जणांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्या मृत्यूस जबाबदार असणारे अजूनही मोकाट फिरत असून, मृतांच्या कुटुंबीयांवर ते दबाव टाकत आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना १५ लाखांची, तर उपचार घेत असलेल्यांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत द्यावी, या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी; अन्यथा सोमवार (२० फेब्रुवारी) ला नगर-आैरंगाबाद रोड येथील पांढरीपूल येथे सकाळी नऊ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. 
पुढील स्लाईडवर वाचा,  पांगरमल दारुकांड प्रकरणाच्या चौकशीची मागणी...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...