आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांगरमल दारूकांडाचा तपास अखेर सीआयडीकडे वर्ग, अण्णा हजारे यांच्या मागणीला यश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पांगरमल बनावट दारुकांड प्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पाठपुराव्याला काही अंशी यश अाले. या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्याचे अादेश शासनाने दिले. राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच हजारे यांना दूरध्वनीवरून तसे कळवलेे. शिवाय बावनकुळे १९ ला हजारेंच्या भेटीला येत आहेत. तथापि, याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी अजूनही कायम असल्याचे हजारे यांनी स्पष्ट केले आहे. 
 
बनावट विषारी दारु प्यायल्यामुळे पांगरमलमध्ये जणांचा बळी गेला. दरेवाडी (ता. नगर) तरवडी (ता. नेवासे) येथेही विषारी मद्यसेवनामुळे जण दगावले. जिल्ह्यात बनावट दारुमुळे १३ हून अधिक जणांचे बळी गेले. याबाबत अण्णा हजारे यांच्या कार्यालयात तक्रारी गेल्या होत्या. त्यामुळे हजारे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेलद्वारे पत्र लिहिले. या पत्राची तातडीने दखल घेण्यात आली. पोलिस राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांनी राळेगणला जाऊन हजारे यांना तपासाची माहिती दिली. 
 
हजारे यांनी मात्र दोन्ही अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. या भेटीनंतर उत्पादन शुल्कमंत्री बावनकुळे यांनीही हजारे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. त्यावेळी या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्याची प्रमुख मागणी हजारे यांनी केली होती. तसेच पोलिस उत्पादन शुल्क विभागाच्या दोन्ही अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली होती. शासनाने हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत. 
दरम्यान, पांगरमल येथील दारुकांडप्रकरणी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद भोईटे हे या गुन्ह्याचा तपास करत होते. या गुन्ह्यात आतापर्यंत १९ आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यापैकी १६ अारोपींना अटक झाली असून ते सध्या तुरुंगात आहेत. एका फरार आरोपीचा अपघाती मृत्यू झाला, तर नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्री माेकाटे तिचे वडील गोविंद मोकाटे हे दोन आरोपी अद्याप फरार आहेत. 
 
तर, पांगरमल दारुकांड प्रकरणात काही पोलिसांवर दोषाचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आलेली आहे. तोफखाना पोलिस ठाण्यातील महिला फौजदारासह तीन पोलिसांचे निलंबन करण्यात आले. एमआयडीसी, तोफखाना स्थानिक गुन्हे शाखेतील सहा पोलिसांची मुख्यालयात बदली करण्यात आली. तर ताेफखान्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांची नियंत्रण कक्षामध्ये बदली करण्यात आली. मात्र, या कारवाईवरही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे. 
 
मुळापासून चौकशी व्हावी 
- पांगरमल प्रकरणातील दोषी पोलिसांवर केवळ बदलीची कारवाई करुन पोलिस अधीक्षकांनी अनेकांना वाचवले आहे. त्याचीही चौकशी व्हावी, तसेच पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांना पहिल्याच नियुक्तीमध्ये क्षेत्रफळाने मोठ्या संवेदनशील जिल्ह्यात नियुक्ती कशी काय मिळाली, याचीही सखोल चौकशी व्हायला हवी.
'' श्यामअसावा, सामाजिक कार्यकर्ते. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, कारवाईच्या मागणीवर ठाम अण्णाहजारे...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...