आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांगरमल दारूकांड; वीस अाराेपींवर ‘मकाेका’ लावला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नगर  - नगर जिल्ह्यातील पांगरमल येथे विषारी दारू प्यायल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला हाेता. तसेच १३ जणांची प्रकृती गंभीर हाेती. त्यापैकी एकाला कायमचे अंधत्व तर एकाला अर्धांगवायू झाला अाहे. याप्रकरणी २० अाराेपींविराेधात न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल करण्यात अाले अाहे. दरम्यान, सीअायडीने  प्रथमच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा वापर करत २० अाराेपींना ‘मकाेका’ लावला अाहे.  

पांगरमल येथे १२ फेबुवारी राेजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उमेदवारांच्या वतीने दारू पार्टीचे अायाेजन करण्यात अाले हाेते. या वेळी विषारी दारू प्राशन केल्याने नऊ जणांना जीव गमवावा लागला. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास नगर पाेलिसांनी केला. मात्र, प्रकरण गंभीर असल्याने १९ एप्रिल राेजी तपास सीअायडीकडे वर्ग करण्यात अाला. सीअायडीने नगर पाेलिसांकडून राहिलेल्या तपासातील त्रुटी दूर करून, मे महिन्यात नगरच्या न्यायालयात दाेन हजार ३९६ पानांचे दाेषाराेपपत्र दाखल केले, तसेच १६३  साक्षीदारांचे जबाबही घेण्यात अाले. दरम्यान, ही विषारी दारू जिल्हा रुग्णालयाच्या कँटीनमध्ये बनवल्याचे स्पष्ट झाले हाेते. 
बातम्या आणखी आहेत...