आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांगरमल दारूकांड: मद्यातील मिथेनॉलमुळेच झाला तेरा जणांचा मृत्यू, व्हिसेरा अहवालात नमूद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पांगरमल(ता. नगर) येथील अति मद्यसेवनामुळे मृत झालेल्या व्यक्तींचे व्हिसेरा अहवाल पाेलिसांना प्राप्त झाले अाहेत. मद्यातील मिथेनॉलमुळेच त्यांचे मृत्यू झाल्याचे या अहवालात नमूद केलेले आहे. मात्र हे मिथेनॉल कोठून आणले, याबाबत आरोपी माहिती देत नाहीत. त्यामुळे अधिक तपासासाठी तीन आरोपींच्या पोलिस कोठडीत सोमवारपर्यंत (२७ फेब्रुवारी) वाढ करण्यात आली, तर धुळ्यातून अटक केलेल्या मद्यतस्कर दादा वाणीलाही २७ पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. 

अति मद्यसेवनामुळे पांगरमल (ता. नगर) परिसरातील सुमारे नऊ लोकांना प्राण गमवावे लागले आहे, तर बनावट दारू पिल्यामुळे नगर तालुक्यातील दोन पारनेर तालुक्यातील दैठणे येथील दोघांना प्राणास मुकावे लागले. जिल्ह्यात दारूमुळे आतापर्यंत तेरा बळी गेले आहेत. पांगरमल दुर्घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आतापर्यंत १६ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. त्यापैकी १२ जणांना अटक झाली आहे. सध्या चौघे पोलिस कोठडीत असून जण न्यायालयीन कोठडीत आहेत. बनावट मद्यनिर्मितीच्या रॅकेटमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जितू गंभीर, कथित पत्रकार जाकीर शेख, हमीद शेख, मोहन दुगल, संदीप दुगल, भरत जोशी, याकूब शेख, नन्हे शेवानी, आदींची नावे समोर आली आहेत. गंभीर, शेख, दुगल, जोशी हे मद्यनिर्मिती करायचे. इतर आरोपी त्यांना कच्चा माल पुरवत होते, असे तपासात निष्पन्न झाले. धुळ्याचा वाणी या रॅकेटमध्ये अल्कोहोलचा पुरवठा करत असल्याचे समोर आले. त्यालाही या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केले आहे. मात्र, याकूब शेख नन्हे शेवानी हे फरार आहेत. 
 
दादा वाणीनेही नगरच्या आरोपींनी अल्कोहोल पुरवल्याचे सांगितले आहे. मात्र त्याने अल्कोहोल कोणाकडून आणले, याकूब शेखचा शोध घ्यायचा आहे, त्याच्या घराची झडतीची गरज आहे, आरोपींनी मिथेनॉल कोणाकडून घेतले होते, दारुसाठी मिथेनॉलचा नेमका कोणी वापर केला, याबाबत सखोल तपासाकरिता आरोपींना पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती तपासी अधिकारी पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे यांनी केली. ती मान्य करीत न्यायालयाने आरोपींना २७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

उत्पादन शुल्कचे पाच जण निलंबित 
पांगरमल दारूकांडात बनावट मद्यनिर्मिती करण्यास जबाबदार असल्याचा ठपका ठेवत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पाच जण निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये तीन अधिकारी दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक एस. पी. शिंदे, दुय्यम निरीक्षक बी. आर. पगारे बी. टी. व्यवहारे यांच्यावर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे. याशिवाय उत्पादन शुल्क विभागाचे दोन कर्मचारीही निलंबित करण्यात आले आहेत. 

 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...