आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतसंस्थांचा वसूली अधिभार रद्द : सहकार मंत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- ‘सहकार विभाग पतसंस्थांकडून वसूल करत असलेला रिकव्हरी सरचार्ज (वसुली अधिभार) रद्द करण्यात येईल. तसेच केवळ जिल्हा सहकारी बँकेकडूनच कर्ज घेण्याची पगारदार पतसंस्थांवर लावण्यात आलेली सक्तीही उठवण्यात येईल’, असे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी जाहीर केले.

आदर्शगाव हिवरेबाजार येथे आयोजित राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वार्षिक सभेत ते बोलत होते. पतसंस्थांच्या थकबाकी वसूलीसाठी सहकार विभागाकडून वसूली अधिभार घेण्यात येतो. मात्र, फेडरेशन तसेच पतसंस्थांच्या माध्यमातून थकबाकी वसुलीची प्रक्रिया राबवण्यात येते. त्यामुळे यापुढे वसुली अधिभार रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. पतसंस्थांनी हा अधिभार रद्द झाला असे समजावे. सरसकट सर्वच पतसंस्थांना जिल्हा सहकारी बँकेत ठराविक रक्कम ठेव म्हणून ठेवण्याचे तसेच याच बँकांकडून कर्ज घेण्याचे बंधन आहे. यात पगारदार कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतसंस्थांचाही समावेश आहे. किमान पगारदार पतसंस्थांवरील हे बंधन उठवण्यात येईल. त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.