आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पे अॅण्ड पार्क’ ठरणार नागरिकांसाठी डोकेदुखी, आरक्षित जागामालकांचा नाही प्रतिसाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहरात २५ ठिकाणी “पे अॅण्ड पार्क’ची सुविधा सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. महापौर सुरेखा कदम यांनी हा प्रस्ताव १४ सप्टेंबरला होणाऱ्या महासभेच्या अजेंड्यावर घेतला आहे. या प्रस्तावाच्या मंजुरीनंतर ज्या ठिकाणी पार्किंग सुरू होईल, त्या ठिकाणच्या नागरिकांची डोकेदुखी वाढणार आहे. या २५ ठिकाणांमध्ये अनेक सार्वजनिक रस्ते काही खासगी जागांचा समावेश आहे. कोणत्याही हरकती मागवता प्रशासनाने हा प्रस्ताव तयार केला. त्यामुळे तो वादात सापडणार आहे. 

काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या स्थायी समितीने रस्त्याच्या कडेला पे अॅण्ड पार्क सुरू करण्याचा निर्णय घेतला. काही ठिकाणी ही सुविधा सुरू करण्यात आली. परंतु परिसरातील नागरिकांसाठी ही सुविधा चांगलीच डोकेदुखी ठरली. आनंदऋषी रुग्णालयाजवळ रस्त्याच्या कडेला सुरू करण्यात आलेल्या पे अॅण्ड पार्कमुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याऐवजी ती अधिक वाढली. यासंदर्भात अनेक जागरूक नागरिकांनी लेखी तक्रारी केल्या. मात्र, नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवत आणखी २५ ठिकाणी अशी पे अॅण्ड पार्कची सुविधा सुरू करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. 

एकीकडे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, तर दुसरीकडे ही समस्या सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनाने अद्याप कोणत्याच ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणतेच विशेष प्रयत्न झालेले नाहीत. वर्षभरापूर्वी महापालिका प्रशासनाने हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. शहराच्या विविध भागात वाहनतळांसाठी आरक्षित असलेल्या १८ जागा विकसित करण्याचा प्रस्ताव तयार करून संबंधित जागामालकांशी पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, संबंधित जागा मालकांकडून कोणताच प्रतिसाद मिळाल्याने हा प्रस्ताव गुंडाळण्यात आला. त्यानंतर प्रशासनाने सार्वजनिक रस्ते खासगी जागांवर पे अॅण्ड पार्क सुरू करण्याचा घाट घातला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, खासगी जागामालक, तसेच ठिकाण निश्चित करण्यात आलेल्या संबंधित भागातील नागरिकांच्या कोणत्याही हरकती मागवता हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. 

हरकतींशिवाय प्रस्ताव मंजूर करू नये 
शहराच्याकाहीभागात राजरोसपणे अनधिकृत पार्किंग सुरू आहे. तेलीखुंटजवळील जुन्या सरकारी रुग्णालयाच्या जागेवर मागील काही वर्षांपासून अाधिकृत पार्किंग सुरू आहे. वाहनचालकांची अडवणूक करत त्यांच्याकडून जास्तीचे पैसे उकळण्याचा उद्योग राजरोस सुरू आहे. महापालिका रस्त्याच्या कडेला खासगी जागांवर पे अॅण्ड पार्क सुरू करून या प्रकाराला खतपाणी घालण्याचे काम करत आहे. हरकती घेतल्याशिवाय पे अॅण्ड पार्कचा हा प्रस्ताव मंजूर करू नये.
- शाकीरशेख, सामाजिक कार्यकर्ते. 

अतिक्रमण केलेल्या जागांकडे दुर्लक्ष 
शहरात सुमारे नऊशेपेक्षा अधिक पक्की अतिक्रमणे आहेत. त्यात अनेक कॉॅम्प्लेक्स, अपार्टमेंट, रुग्णालये, हॉटेल, तसेच मंगल कार्यालयांचा समावेश आहे. पार्किंगची जागा इतर कारणांसाठी वापरत अनेकांनी अतिक्रमण केले. ही अतिक्रमणे हटवण्याऐवजी रहदारीचे सार्वजनिक रस्ते खासगी जागांवर पे अॅण्ड पार्क सुरू करून महापालिका प्रशासन नागरिकांना वेठीस धरत असल्याचे काही नागरिकांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. 

वाहतळ उभारण्यासाठी आरक्षित असलेल्या जागामालकांसमोर दोन पर्याय ठेवण्यात आले होते. ज्या जागेवर वाहतळाचे आरक्षण आहे, त्या मालकाने स्वत:च वाहनतळाची व्यवस्था करून ते चालवावे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर जागामालकांचाच हक्क राहणार होता. हा पर्याय मान्य नसेल, तर जागामालकाने दुप्पट हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) घेऊन ती जागा महापालिकेकडे हस्तांतरीत करावी, असे दोन पर्याय प्रशासनाने ठेवले होते. प्रतिसाद मिळाल्याने हा प्रस्ताव गुंडाळण्यात आला. 
बातम्या आणखी आहेत...