आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण: धस यांच्या भाजप प्रवेशासाठी राम शिंदे यांच्याच पायघड्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राम शिंदे - Divya Marathi
राम शिंदे
नगर - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश धस यांच्या कर्जत-जामखेड दौऱ्याचा दोन वर्षांपासून धसका घेणारे पालकमंत्री राम शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत धस यांच्या भाजप प्रवेशासाठी पायघड्या घातल्या अाहेत. धस यांच्या भाजप प्रवेशाने शिंदे यांचा आगामी विधानसभेचा मार्ग मोकळा होणार आहे. 
 
कर्जत-जामखेडला लागून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका आहे. आष्टी हा धस यांचा बालेकिल्ला समजला जातो. तथापि, गेल्या विधानसभा निवडणुकीत धस यांना या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. यापूर्वी दोन वेळा धस हे या मतदारसंघाचे आमदार होते. सध्या या मतदारसंघात भाजपचे भीमराव धोंडे आमदार आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघात मराठा, माळी, धनगर वंजारी समाजाचे प्राबल्य आहे. त्यातही मराठा वोट बँक मोठ्या प्रमाणात आहे. आष्टी मतदारसंघ धस यांच्या ताब्यातून गेल्यामुळे कर्जत-जामखेडचे आमदार सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले राम शिंदे यांच्या मतदारसंघात गेल्या दोन वर्षांपासून धस यांचे दौरे वाढले होते. धस किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य नेहमीच या मतदारसंघातील कार्यक्रमांना हजेरी लावत असत. कर्जत-जामखेडच्या दौऱ्यात धस मंत्री शिंदे यांच्यावरच टीका करायचे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने धस यांचे दौरे वाढले होते. धस यांच्या या मतदारसंघातील वाढत्या दौऱ्यांचा शिंदे यांनी चांगला धसका घेतला होता. 
 
बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केल्याबद्दल धस यांना राष्ट्रवादीतून निलंबित करण्यात आले. राष्ट्रवादीतून निलंबित झाल्यानंतर धस भाजपच्या संपर्कात आले आहेत. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना डावलून त्यांनी पालकमंत्री शिंदे यांच्या मध्यस्थीने भाजपच्या वरिष्ठांशी भेटीगाठी सुरू केल्या होत्या. महिन्याभरापूर्वी शिंदे यांच्या मध्यस्थीने मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी धस यांची गुप्त भेट झाली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री सर्व शासकीय लवाजमा सोडून खासगी वाहनातून धस यांना भेटण्यासाठी गेल्याची चर्चा आहे. पंधरा मिनिटे या तिघांमध्ये चर्चा झाली. या चर्चेत धस यांनी काही मागण्या घातल्याचे बोलले जाते. 
धस यांच्या भाजप प्रवेशासाठी राम शिंदे स्वत: प्रयत्न करत असून, धस हे मे रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. धस यांच्या भाजप प्रवेशाने शिंदे यांचा आगामी विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्याचबरोबर धस यांना पक्षात आणल्याबद्दल थेट मुख्यमंत्र्यांकडून त्यांना शाबासकीचे थाप मिळेल. एकाच दगडात दोन पक्षी मारण्याची शिंदे यांची व्यूरचना जवळपास यशस्वी झाल्याचे बोलले जाते. 
 
शिंदे यांचा प्रचार धस करणार? 
नेहमी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस पालकमंत्री राम शिंदे यांचे मनोमिलन हा या मतदारसंघातील चर्चेचा विषय ठरला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत धस हे शिंदे यांचा प्रचार करणार असल्याची चर्चा सध्या आहे. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, धस, पाचपुते यांना महामंडळाचा शब्द...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...