आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊर्जामंत्री बावनकुळे यांना आठवला दहा महिन्यांनी ‘जनता दरबार’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘जनता दरबार’ घेऊ, अशी घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी २८ जुलै २०१६ रोजी केली होती. त्या घोषणेची नगरमध्ये तब्बल दहा महिन्यांनंतर अंमलबजावणी होत आहे. ऊर्जामंत्र्यांचा नगरमध्ये २७ एप्रिलला जनता दरबार होणार आहे. 
 
महावितरणच्या प्रकाशगड कार्यालयात २८ जुलै २०१६ रोजी बैठक झाली होती. या बैठकीस ऊर्जामंत्री बावनकुळे, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार, ऊर्जामंत्र्यांचे सल्लागार विश्वास पाठक अादी उपस्थित होते. या बैठकीत शेतकऱ्यांचे प्रलंबित वीजजोड, फीडर मॅनेजर योजना, राज्यातील सर्व मुख्य अभियंता/अधीक्षक यांचा शुक्रवार शनिवारचा दौरा कार्यक्रम, राज्यात ट्रान्सफॉर्मर भवनची निर्मिती, कर्मचारी मुख्यालयी राहणे, नवीन वीज बिल भरणा केंद्र ग्रामपंचायत स्तरापर्यंत आणणे आदी विषयांचा आढावा घेण्यात आला. 
 
ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यात जनता दरबार घेऊ, अशी घोषणा ऊर्जामंत्र्यांनी या बैठकीत केली होती. मात्र, या घोषणेनंतर ऊर्जामंत्र्यांनी केवळ विदर्भातच दौरे केले. महावितरणशी संबंधित अडचणी, तक्रारींबाबत त्यांनी ग्राहकांशी संवाद साधला नाही. या घोषणेला दहा महिने उलटल्यानंतर ऊर्जामंत्र्यांना जनता दरबाराची आठवण झाली आहे. ते २६ २७ एप्रिल रोजी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. २७ एप्रिल रोजी ते स्टेशन रोडवरील विद्युत भवन येथे दुपारी १२ ते या वेळेत महावितरणशी निगडित असलेल्या ग्राहकांच्या, तसेच सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून तक्रारी, सूचना निवेदने स्वीकारतील त्यांच्या समस्यांचे निराकरण करणार आहेत. 
 
दरम्यान, आतातरी ऊर्जामंत्र्यांनी नियमित जनता दरबार घेऊन ग्राहकांच्या अडचणी, तक्रारींची सोडवणूक करावी, महावितरणने ग्राहकाला शाश्वत वीज उत्कृष्ट सेवा देणे तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, बऱ्याच वेळा कर्मचारी व्यवस्थित बोलत नाहीत, माहिती देत नाहीत, अशा ग्राहकांच्या तक्रारी आहेत. शहरातील मिरवणूक मार्गावरील वीजवाहिन्या भूमिगत करण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हा भूमिगत वीज वाहिन्यांचा प्रश्न ऊर्जामंत्र्यांनी तातडीने मार्गी लावावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य ग्राहक व्यक्त करत आहेत. 
 
आधी घोषणांची पूर्तता करा.... 
- राज्य शासन विविध घोषणा करते. मात्र, त्याची पूर्तता होत नाही. एका रुपयात शासकीय कार्यालयात जागा देण्याचा आदेश काढण्यात आला होता. मात्र, महावितरणच्या वीज उपकेंद्रासाठी अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जागा मिळाली. अनेक वीजजोड प्रलंबित आहेत. त्यामुळे घोषणा करण्यात अर्थ नाही, तर त्या पूर्ण होणे गरजेचे आहे.'' विलासजगदाळे, अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अहमदनगर.
बातम्या आणखी आहेत...