आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राचार्य शिक्षकाच्या समर्थनार्थ श्रीगोंद्यात विद्यार्थ्यांचा मोर्चा, आदिवासी महिलेवर अत्याचार प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे- पतीला नोकरीत कायम करतो, असे आमिष दाखवून येथील शिक्षक एम. डी. साबळे याच्यावर आदिवासी महिलेने बलात्काराचा प्राचार्य टी. पी. कन्हेरकर विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा शुक्रवारी दाखल केला. प्राचार्य शिक्षकाच्या समर्थनार्थ गुन्हा मागे घेण्याची मागणी करत शहरातील सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी शनिवारी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. 
 
महादजी शिंदे महाविद्यालयापासून मोर्चास प्रारंभ झाला. त्यात या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी शिक्षक सहभागी झाले होते. पोलिस ठाण्यापासून ते शनिचौकापर्यंतचा परिसर मोर्चामुळे बंद होता. प्राचार्य शिक्षकावर दाखल झालेला गुन्हा खोटा, अन्यायकारक ब्लॅकमेलिंग करणारा आहे. पोलिसांनी त्याचा तपास करून तो मागे घ्यावा. खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या प्रवृतींचा निषेध व्हावा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा होता. विद्यार्थ्यांनी पोलिस अधिकारी तहसीलदारांच्या प्रतिनिधींना निवेदन दिले. 
 
याप्रसंगी माजी जि. प. अध्यक्ष बाबासाहेब भोस, शिवसेना नेते घनश्याम शेलार, राष्ट्रवादीचे प्रा. तुकाराम दरेकर, माजी उपनगराध्यक्ष अख्तर शेख, नगरसेवक अशोक खेंडके, राजू गोरे, नानासाहेब कोथिंबिरे, एम. डी. शिंदे, सुनील वाळके, अशोक आळेकर, बापूराव सिदनकर, रमजान हवालदार, एम. एस. लगड, शिवसेना तालुकाध्यक्ष संजय आनंदकर, बाळासाहेब शेलार, भीमराव आनंदकर आदी उपस्थित होते. 
 
मोर्चा सुरू असताना छायाचित्र घेत असताना पत्रकार शिवाजी साळुंके यांना पोलिस उपनिरीक्षक संजयकुमार सोने पोलिस गजानन गायकवाड यांनी अपमानास्पद वागणूक दिली. या घटनेचा श्रीगोंद्यातील सर्व पत्रकारांनी तातडीने निषेध केला. उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी या प्रकरणी खेद व्यक्त करत संबंधितांना समज देण्यात येईल, असे आश्वासन पत्रकारांच्या शिष्टमंडळाला दिले. 
 
दुष्ट प्रवृतींचा बंदोबस्त करा 
- खोटे गुन्हे दाखल करून अॅट्रॉसिटीचा उपयोग अन्याय करण्यासाठी करणाऱ्यांना रोखण्याची गरज आहे. अशा दुष्ट प्रवृत्तींचा बंदोबस्त केला पाहिजे. शिक्षण क्षेत्रासाठी ही घटना धोक्याचा इशारा देणारी आहे. गुन्हा दाखल करण्यामागील हेतूचा उलगडा करून पोलिसांनी सत्य बाहेर आणले पाहिजे.'' घनश्यामशेलार, जिल्हा समन्वयक, शिवसेना. 
बातम्या आणखी आहेत...