आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधाकृष्ण विखेंना थोरल्या बंधूंकडून कायदेशीर नाेटीस, भाजपच बोलविता धनी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - सत्ताअसताना पदाचा गैरवापर करून राधाकृष्ण विखे पाटील यांनी बेकायदेशीर कामे केल्याप्रकरणी त्यांना नोटीस बजावल्याची माहिती राधाकृष्ण यांचे मोठे बंधू अशोक विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत देऊन खळबळ उडवून दिली. त्यामुळे विखे पाटील घराण्यातील कलह उघड झाला आहे. विखे पाटील यांनी त्यासाठी धुळवडीचा ‘मुहूर्त’ साधल्याची चर्चा यामुळे राजकीय वर्तुळात रंगली आहे. 
 
ईडीच्या अधिकाऱ्याचा संदर्भ देत राधाकृष्ण यांनी प्रवरा मेडिकल कॉलजसाठी झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनकडून कोट्यवधींचा निधी घेतला, असा आरोपही अशोक पाटलांनी केला. 

भाजपच बोलविता धनी 
राधाकृष्णहे काँग्रेस पक्षाचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते असले तरी प्रत्यक्षात भाजपच त्यांचा बोलविता धनी असल्याचा आरोप अशोक विखे यांनी याप्रसंगी केला. राज्य शासनाच्या विरोधात आरोप झाले तर काय उत्तरे द्यावीत, याची कल्पना विखेच मुख्यमंत्र्यांना सांगतात, असे अशोक विखे म्हणाले.
 
पुढील स्लाईडवर वाचा, विखे बंधूंतील वादाच्या मुळाशी वर्चस्वाची लढाई...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...