आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठेवीदारांची ना दाद, ना फिर्याद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- आयुष्याची सर्व पुंजी दोन-तीन टक्के जादा व्याजासाठी पतसंस्थांमध्ये ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेच्या ठेवीदारांची सरकारदरबारी, तर कोणी दाद घेईना, पण नगरचे पोलिस त्यांची साधी फिर्यादही घेत नाहीत, अशी स्थिती आहे. आधीच आर्थिक फसवणूक, तक्रारीसाठी दिल्लीच्या वाऱ्या पोलिसांची असंवेदनशीलता अशा वाईट चक्रात ठेवीदार अडकले आहेत. नगरच्या कोतवाली तोफखाना पोलिस ठाण्यांत याबाबत अतिशय वाईट अनुभव आल्याची खंत रायसोनी मल्टिस्टेट पतसंस्था ठेवीदार कृती समितीचे प्रमुख डी. एम. कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
आपल्या फसवणुकीबद्दल तक्रार करण्यासाठी कुलकर्णी एक जून रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात गेले. तेव्हा आधी त्यांना जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), सरकारी लेखा परीक्षकांकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला. कुलकर्णी यांनी या रायसोनी पतसंस्थेत १० मे २०१४ रोजी ‘सुवर्ण लक्ष्मी मासिक प्राप्ती योजने’अंतर्गत दोन लाख रुपये गुंतवले. त्याची मुदत १० मे २०१५ रोजी संपली. आपली रक्कम व्याजासह (दोन लाख ३९ हजार रुपये) घेण्यासाठी क्ुलकर्णी पतसंस्थेच्या सावेडी शाखेत गेले असता, तेथील व्यवस्थापकांनी पैस परत करण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यानंतर कुलकर्णी यांनी आधी ठेवीदार कृती समिती स्थापन करून आवाज उठवण्यास सुरुवात केली.
जिल्ह्यातही तोच अनुभव
रायसोनी पतसंस्थेने फसवलेले ठेवीदार जिल्हाभर आहेत. संगमनेर, शेवगाव, जामखेड येथेही ठेवीदारांनी तक्रार देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची तक्राही स्वीकारली नाही. राहुरी पोलिस ठाण्यात मात्र तीन महिन्यांपूर्वी एका ठेवीदाराची तक्रार नोंदवली. त्याबाबत पुढे काहीच तपास झाला नाही. दरम्यान, कुलकर्णी सहकाऱ्यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांना १५ जून रोजी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, दिल्लीतही तोच अनुभव...ठेवीदारांची फसवणूक...
बातम्या आणखी आहेत...