आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मनोधैर्य’ जाहीर होऊनही चिमुकलीच्या नशिबी हेळसांड, बलात्कार पीडितेसह पालक बेपत्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अडीच महिन्यांपूर्वी केडगाव परिसरात चिमुकलीवर झालेल्या बलात्कारामुळे संपूर्ण देश हळहळला. अत्याचारानंतर आरोपीने तिला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला. सुरुवातीला पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे ती वाचली. काही दिवसांनी आरोपीही पकडला गेला. याबाबत स्नेहालयच्या पाठपुराव्यानंतर या बालिकेला मनोधैर्य योजनेतून मदतही जाहीर झाली. मात्र, पोलिस शासकीय बालसेवी यंत्रणांच्या कार्यपद्धतीमुळे ही अत्याचारग्रस्त बालिका फेब्रुवारीपासून तिच्या पालकांसह बेपत्ता आहे. 
 
बाळू गंगाधर बर्डे (वय ३०, सोनगाव, राहुरी) याने बालिकेच्या आई-वडिलांशी ओळख वाढवून त्यांचा विश्वास संपादन केला. डिसेंबर २०१६ ला सायंकाळी त्याने वर्षांच्या चिमुकलीवर रेल्वेस्टेशन परिसरात निर्जन ठिकाणी अत्याचार केले. तिला तेथेच सोडून तो पळून गेला. ही माहिती चाईल्डलाइन कोतवाली पोलिसांना समजताच त्यांनी मुलीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. अत्यवस्थ असल्याने नंतर तिला पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे तिच्यावर अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हापासून तिची दररोज वैद्यकीय तपासणी गरजेची झाली. 

या सर्व घटनाक्रमात तिचे आई-वडील बेपत्ताच होते. नगर पोलिसांनी आणि चाईल्डलाइनच्या कार्यकर्त्यांनी पालकांची आरोपीचा शोध मोहीम सुरूच ठेवली. तीन दिवसांनी बालिकेला ससून हॉस्पिटलमधून पुन्हा नगरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान, तिच्या आई-वडिलांचा शोध लावण्यात आला. आरोपीचाही माग शोधून पोलिसांनी त्याला जेरबंद केले. चाईल्डलाइनच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा पोलिसांना केलेली मदत यात महत्त्वाची ठरली. चिमुकलीच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाल्यावर स्नेहालय चाईल्डलाइनने मुलीला निवारा देण्याची तयारी दर्शवली, पण तिच्या आई-वडिलांनी याला नकार देत मुलीला स्वतःकडे ठेवण्याचा आग्रह धरला. 

बाल कल्याण समितीने या चिमुकलीला संस्थात्मक आश्रय द्यावा, असा एक तोंडी आदेश दिला. तथापि, नगरच्या शासकीय बालगृहाने बालिकेला आश्रय देण्यास असमर्थता दर्शवली. बालिका अनाथ नसून तिला आई-वडील असल्याने शासन आदेशानुसार तिला संस्थेत आश्रय देता येत नसल्याचे कारण त्यांनी दिले. वास्तविक बालिकेला जंतुसंसर्ग होण्याची भीती असल्याने रुग्णालयाची सुविधा असलेल्या स्नेहालयसारख्या संस्थेत ठेवण्याची आवश्यकता होती. 
चाईल्डलाइन स्नेहालय यांनी या बालिकेला मदत, औषधोपचार संरक्षण देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला. मात्र, एक महिन्यापूर्वी मुलीला घेऊन तिचे आई-वडील बेपत्ता झाले.
 
चाईल्डलाइनने कोतवाली पोलिस ठाण्यात बालिका बेपत्ता असल्याची फिर्याद नोंदवण्याचा प्रयत्न केला. पण, मुलगी तिच्या पालकांसोबत असल्याने तिचा अथवा तिच्या पालकांचा शोध घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे पोलिसांनी सांगितले. याबाबत महिला बाल विकासकडेही दाद मिळाली नाही. 

शासनातील कोणतीही यंत्रणा यासंदर्भात जबाबदारीने आणि संवेदनशीलपणे कर्तव्यपालन करत नाही. या विदारक वस्तुस्थितीकडे स्नेहालय परिवारातर्फे केंद्रीय महिला बालविकास मंत्री मनेका गांधी यांच्यासह शासनातील सर्व यंत्रणांचे लक्ष ई-मेलद्वारे वेधले. त्यांनी मदतही जाहीर केली. मात्र, कळी तिचे पालक सध्या बेपत्ता झाल्यामुळे या मदतीचा तिला लाभ मिळणे कठीण झाले आहे. 
 
मंत्र्यांचे लक्ष वेधले 
याबाबत स्नेहालयच्या डॉ. प्राजक्ता कुलकर्णी आणि हनिफ शेख यांनी केंद्रीय महिला बाल विकास मंत्री, मनेका गांधी यांना ई-मेल पाठवून संपूर्ण माहिती दिली. त्यांनी केंद्र शासनाच्या ‘मनोधैर्य’ योजनेतून बालिकेला आर्थिक वैद्यकीय मदत जाहीर केली. पण बालिकेसह तिचे संपूर्ण कुटुंबच सध्या फरार आहे. हे कुटंुब शोधण्यात शासकीय यंत्रणा मदत करायला तयार नाहीत. चाईल्डलाइन स्नेहालयने एक स्वतंत्र पथक कळी तिच्या कुटुंबाच्या शोधासाठी कार्यरत केले आहे. मात्र, त्यात अद्याप यश आलेले नाही. 

पुनर्वसनाला नकार 
स्नेहालयने बालिकेची सेवाशुश्रुषा तिचे दीर्घकालीन पुनर्वसन करण्याची तयारी दर्शवली. पण तिच्या आई-वडिलांनी त्यालाही नकार दिला. मुळात आई-वडिलांच्या बेजबाबदारपणामुळे अत्याचार होतो, तेव्हा अशा बालिकेस ताब्यात घेऊन सुयोग्य संस्थेत पुनर्वसन करण्याचा अधिकार बाल न्याय अधिनियमानुसार बाल कल्याण समितीस आहे, याकडे बालसेवी संस्थांनी लक्ष वेधले. पण आई-वडील मुलीचा ताबा देत नाहीत, हे कारण सांगून बालिकेला बालसेवी संस्थेकडे देण्यास नकार देण्यात आला. 

सोमवारी निदर्शने 
बालिकेला औषधोपचारांची आवश्यकता आहे. आई-वडिलांकडून बालिकेची शुश्रुषा नीट होण्याची शक्यता नाही. त्यामुळे बालिकेचे जीवन टांगणीला लागले असावे, अशी भीती चाईल्डलाइन आणि स्नेहालयाला वाटते. याप्रश्नी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (५ मार्च) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व निदर्शने केली जाणार आहेत.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...