आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारनेरच्या पाणीप्रश्नासाठी स्व. विखेंनी संघर्ष केला : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर येथे स्व. बाळासाहेब विखे यांना सर्वपक्षीयांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, माजी आमदार नंदकुमार झावरे उपस्थित होते. - Divya Marathi
पारनेर येथे स्व. बाळासाहेब विखे यांना सर्वपक्षीयांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, माजी आमदार नंदकुमार झावरे उपस्थित होते.
पारनेर- पारनेर तालुक्याच्या पाणीप्रश्नासाठी स्व. बाळासाहेब विखे यांनी कायम संघर्ष केला. तालुक्याचा पाणीप्रश्न, जर सर्वांनी मिळून सोडवला, तर हिच खरी स्व. विखे यांना श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. 
 
स्व. विखे यांना पारनेर येथे सर्वपक्षीयांतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी हजारे बोलत होते. माजी आमदार नंदकुमार झावरे म्हणाले, समाजातील तळागाळातील कार्यकर्त्यांच्या प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व हरपले. स्व. विखे यांच्या जाण्याने कधीही भरून येणारे नुकसान झाले असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी सीताराम खिलारी, डाॅ. भास्कर शिरोळे, सबाजी गायकवाड, गंगाराम बेलकर, शैलेंद्र औटी, राहुल शिंदे, रामचंद्र मांडगे, विठ्ठल शेळके, संदीप वराळ, किरण ठुबे, राहुल झावरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तुकाराम मते, डाॅ. राजेश भनगडे, शंकर नगरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत गायकवाड, अरुण ठाणगे, पंचायत समिती सभापती गणेश शेळके, भाजपचे विश्वनाथ कोरडे, वसंत चेडे, कम्युनिस्ट पक्षाचे अॅड. पी. आर. कावरे, शाहीर गायकवाड पत्रकार संघातर्फे संजय वाघमारे यांनी श्रद्धांजली वाहिली. 
यावेळी प्राचार्य रंगनाथ आहेर, राजेंद्र चेडे, अर्जुन भालेकर, बाळासाहेब पठारे, नीलेश खोडदे, संजय मते, बाबुराव मुळे, गोपीचंद बेलोटे आदी उपस्थित होते.
 
 
बातम्या आणखी आहेत...